श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे। संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी आधारकार्डशी मोबाईल क्रमांक लिंक करुन बँक पासबुक व मोबाईल क्रमांक सादर करावे. अन्यथा लाभार्थ्यांचे अनुदान येणे बंद होईल अशी माहिती तहसीलदार किशोर यादव यांनी दिली असून ठीक ठिकाणी आयोजित केलेल्या कॅम्पमध्ये लाभार्थ्यांनी आपापले अपडेट केलेली कागदपत्रे आणि मोबाईल क्रमांक सादर करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे

सचिव सामाजिक न्माय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय, मुंबई यांनी संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डि.बी.टी. द्वारे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी नांदेड यांनी माहे फेब्रुवारी २०२५ पासुनचे अर्थसहाय्य केवळ डि.बी.टी. पोर्टलवर ऑन बोर्ड व आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे असे निर्देश दिले आहे.

त्यानुषंगाने माहूर तालुक्यातील काम पुर्ण करण्याच्या दृष्टीने मंडळ निहाय कॅम्पचे आयोजन करण्यात येत असून आपल्या तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांनी आधार कार्डशी मोबाईल क्रमांक आधार सेंटरवर जाऊन लिंक करुन बँक पासबुक खात्याची झेरॉक्स आणी चालु मोबाईल नंबर तसेच हयात प्रमाणपत्र यापुर्वी सादर केले नाही त्यांनी संलग्म करणे साठी तहसिल कार्यालय माहूर येथे सादर करावा.माहूर वाई बाजार सिंदखेड वानोळा या ठिकाणी दि.३० ते दि.८ पर्यंत हे कॅम्प चालू राहणार आहेत

सदरील माहिती सादर न करणाऱ्या लाभार्थ्यांचे अनुदान बंद करण्याबाबत शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. याबाबत सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी व आपले कागदपत्र वर नमुद केलेल्या कॅम्पच्या दिनांकावर आपण स्वत आधार संलग्म् मोबाईल सह हजर राहावे. असे आवाहन तहसिलदार किशोर यादव यांनी केले आहे.
