हिमायतनगर| विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण होण्यासाठी काय केले पाहिजे व सुरक्षित गुंतवणूक करण्यासाठी समजून माहिती घेऊन गुंतवणूकदारांनी पावले उचलली पाहिजे. विद्यार्थ्यांना भांडवली क्षेत्रात गुंतवणुकीच्या अनेक संधी आणि तसेच भांडवली क्षेत्रामध्ये करिअरच्या संधी याविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करताना प्राध्यापक सीमा बाजी (Prof. Seema Baji) सेबी स्मार्ट ट्रेनर, नाशिक यांनी म्हंटले.

त्या मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्था संचलित हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर येथे महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान विभाग करिअर कट्टा आयोजित वित्तीय साक्षरता या विषयावर कार्यशाळा प्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होत्या. कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते लाभल्या होत्या. तर या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक सीमा बाजी सेबी स्मार्ट ट्रेनर, नाशिक ह्या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून करिअर कट्ट्याचे विभागीय समन्वयक डॉ. सतीश चव्हाण तर प्रमुख उपस्थिती म्हणून तालुका आणि महाविद्यालय करियर कट्ट्याचे समन्वयक सहयोगी प्राध्यापक डॉ. दत्ता मगर हे होते.

अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम यांनी काळाची पावले ओळखून विद्यार्थ्यांनी आपल्या गुंतवणुकीचे निर्णय घ्यावेत. तसे विस्तारित होणाऱ्या भांडवली क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी मिळवाव्यात या विषयी मार्गदर्शन केले. तर करियर कट्ट्याचे सहसमन्वयक डॉ. सय्यद जलील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. करियर कट्ट्याचे दुसरे सहसमन्वयक डॉ. संघपाल इंगळे यांनी कार्यक्रमाचे मार्गदर्शक, अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व उपस्थित यांचे आभार मानले. भविष्यातील संधी आणि विद्यार्थ्यांचे व्यवहार यासंबंधी चर्चेवर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयातील मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती लाभली होती.
