नांदेड| येथे सुरु असलेल्या अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंट अंतर्गत शुक्रवारी साखळी सामने संपले असून शनिवारी बलाढ्य आठ संघामध्ये उपांत्यपूर्व फेरीचे सामने रंगणार आहेत.
यात इंडियन आर्मी जालंधर विरुद्ध कस्टम मुंबई संघात सकाळी 10 वाजता पहिला सामना खेळला जाईल. त्यानंतर बीएसएफ जालंधर विरुद्ध ऑरेंज सीटी नागपुर यांच्यात दूसरा सामना सकाळी 11.45 वाजता दरम्यान खेळला जाईल. तीसरा सामना साईं एक्सेलेंसी संभाजीनगर विरुद्ध यूनियन बँक मुंबई यांच्यात दुपारी 13.30 वाजता होईल. तर चौथा आणी शेवटचा सामना ए. जी. नागपुर विरुद्ध एस. जी. पी. सी. अमृतसर यांच्यात खेळला जाईल.
शुक्रवारी एकूण पाच सामने खेळले गेले. त्यात पहिला सामना ए. जी. नागपुर विरुद्ध ऑरेंज सीटी नागपुर संघादरम्यान खेळला गेला आणी हा सामना 1 विरुद्ध 1 गोल अनुसार बरोबरीत सुटला. हा सामना बरोबरीत राहिल्याने दोन्ही संघास समान गुण मिळाले आणी दोन्ही संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरले. आजचा दूसरा सामना यूनियन बँक मुंबई विरुद्ध चार साहबजादे हॉकी अकाडेमी नांदेड मध्ये खेळला गेला. यूनियन बँक संघाने हा सामना 6 विरुद्ध 0 गोल अंतराने जिंकला. कार्तिक पटारे याने यूनियन बँक मुंबई साठी 3 गोल केले.
आजचा तीसरा सामना एमपीटी मुंबई विरुद्ध साईं एक्सेलेंसी संभाजीनगर यांच्यात खेळला गेला. साईं एक्सेलेंसी संघाने हा सामना 2 विरुद्ध 0 गोल अंतराने जिंकला. चौथा सामना पीएसपीसीएल पटिआला आणी सूफियाना क्लब अमरावती संघात खेळला गेला. पटिआला संघाने हा सामना एकतर्फा ठरवत 5 विरुद्ध 0 गोल अंतराने जिंकला. देविंदरसिंघ याने संघासाठी दोन गोल केले.
आजचा शेवटचा सामना ए. जी. हैदराबाद विरुद्ध एसजीपीसी अमृतसर यांच्यात खेळला गेला. अमृतसर संघाने हा सामना 4 विरुद्ध 0 गोल अंतराने जिंकला आणी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. कमलजीतसिंघ याने सामन्यात दोन गोल केले. आजच्या विविध सामन्यात राजकुमार झा, रतिन्दरसिंघ बरार, गुरप्रीतसिंघ, सिद्धार्थ गौर, करणदीपसिंघ, अश्विनीकुमार यांनी पंच म्हणून कामगीरी पहिली. गुरमीतसिंघ, राहूल राज, गुरतेजसिंघ, प्रिंससिंघ, विजय प्रकाश मंगलूरकर यांनी तांत्रिक पंच म्हणून कार्य केले.