नांदेड| सिंधुदूर्ग जिल्हा जलतरण संघटना, सिंधुदूर्ग व महाराष्ट्र राज्य अॅक्वेटीक असोसिएशन, महाराष्ट्र यांच्या तर्फे मालवण जि. सिंधुदूर्ग येथे आयोजित 14 व्या राज्यस्तीय सागरी जलतरण स्पर्धेत नांदेड जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदार रामेश्वर राजकुमार जाधव, जयप्रकाश मोतीराम क्षिरसागर यांनी उत्कृष्ट कामगीरी केली आहे.
सिंधुदूर्ग जिल्हा जलतरण संघटना, सिंधुदूर्ग व महाराष्ट्र राज्य अॅक्वेटीक असोसिएशन, महाराष्ट्र यांच्या तर्फे दिनांक 21 व 22 डिसेंबर, 2024 रोजी मालवण जिल्हा सिंधुदूर्ग येथे राज्यस्तरी सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत राज्यातील व परराज्यातील 1400 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. नांदेड जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदार रामेश्वर राजकुमार जाधव यांनी तीन किलो मीटर सागरी जलतरण स्पर्धा 28.43 मिनीटात पुर्ण करून विशेष प्राविण्यासह 9 क्रमांक पटकावला तर जयप्रकाश मोतीराम क्षिरसागर यांनी हेच अंतर 43 मीनीटात पुर्ण करून 17 वा क्रमांक मिळवत उत्कृष्ट कामगीरी केली. या यशाबद्दल अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी योग्य ते बक्षिस देवुन सत्कार केला आहे.
सदरची कामगीरी बद्दल अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, अश्विीनी जगताप, उपविभागीय पोलीस अधीकारी कंधार चार्ज गृह पोलीस अधीक्षक नांदेड, विजय धोंडगे, राखीव पोलीस निरीक्षक, पो.मु. नांदेड, क्रिडा प्रशिक्षक श्री संतोष सोनसळे यांनी सदर अंमलदाराचे कौतुक करून अभिनंदन केले व पुढील क्रिडा स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या.