हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव – हिमायतनगर तालुक्यात बायपास तथा अंडरग्रावूंड ड्रेनेज असे अनेक कामे करावायाची होती. परंतु या पुर्वीच्या लोकप्रतिनिधीच्या राजकीय विरोधामुळे कामे करता आला नाही. आता तो अडथळा दुर झाल्याने ही विकास कामे करावायची आहेत. अस हदगाव विधानसभा क्षेञाचे आ. बाबुराव कदम कोहळीकर यांनी हदगाव शहरात आयोजित भव्य नागरी सत्कार व माजी खा.सुभाष वानखेडे याच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या मंचावरून बोलताना केलं.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष विधापरिषदगट नेते आ. हेमत पाटील हे होते तर हदगाव विधानसभा क्षेञाचे आ. बाबुराव कदम कोहळीकर याचा नागरी सत्कार व माजी खा सुभाष वानखेडे याच्या वाढदिवसाच्या या भव्य सोहळ्याचे शानदार आयोजन आनिल पाटील बाभळीकर यांनी केले होते. या सोहळ्याला प्रामुख्याने नादेड जिल्हा शिवसेना प्रमुख विवेक देशमुख, माजी प.स. सभापती बाळासाहेब कदम, माजी शिवसेना तालुका प्रमुख व शहरप्रमुख पाडुरंग मामा कोल्हे, प्रताप सोंळके, सभाराव लाडगे, भाजपा तालुका अध्यक्ष तातेराव पाटील, शहर प्रमुख बबन माळोंदे आदींसह हिमायनगर तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, आशिष सकवाण आदीसह असख्य नागरिक या भव्य सोहळ्याला आवर्जून उपस्थित झाले होते.
यावेळी पुढे बोलताना आ. बाबुराव कदम कोहळीकर म्हणाले की, आपल्या मतदार संघात अनेक वर्षापासुन एमआयडीसीचा प्रश्न प्रलंबीत असुन, ही बाब राज्याचे तात्कालिक मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंञी एकनाथराव शिदे यांना निवडणूकीच्या अगोदर व निवडणूकी नंतर कानावर घातला आहे. युवकाना रोजगार मिळवा असा माझा प्रयत्न आहे असही आ.कोहळीकरांनी सागितले.
गुरु शिष्याची जुलबंदी ….
माजी खा सुभाष वानखेडे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, आज महाराष्ट्रात सत्ता आपली आहे. नक्कीच विकास कामाकरिता आमदार महोदय निधी खेचुन आणतील. असा आशावाद व्यक्त करुन ते पुढे म्हणाले की, या व्यासपिठावर दोन्ही आमदार उद्देशून म्हणाले की, तुम्ही विधानसभा लढवा की लोकसभा लढवा माञ माझ पण थोडा विचार करावा अस गंमतीन सागितले. माझा वापर खेळणी सारखा करु नका मी ही आपणा करिता खुप काही केलं आहे. मला विश्वास आहे की, माझ्यासाठी काही तरी नक्कीच करतील. असही माजी खा. सुभाष वानखेडे यांनी अपेक्षा व्यक्त केली.
तोच धागाधरुन विधान परिषदेचे गटनेते आ. हेमत पाटील यांनी सागितले की, बाबुराव कदम कोहळीकर हे तळागळातील कार्यकर्ते आहेत. ते सहज आमदार झालेल नाहीत त्यांना पण खुप मेहनत घ्यावी लागली आहे. वानखेडे साहेबाच्या काळात मी शिवसेना जिल्हाप्रमुख होतो त्यांच्या सह्योगान होतो हे कबुल करुन ते पुढे म्हणाले की, तुम्ही पुर्वी पण साहेब होता आज पण आमचे साहेबच आहात. असा गौरवपुर्ण उल्लेख करुन ते पुढे म्हणाले की, आपण पंधरा वर्षापुर्वी मंञी राहीले आसता मी पक्षाकडुन एबी फार्म लिहुन आणला होता. तेव्हा मी भाजपा मध्ये जाऊ नका म्हणून विनंती केली होती पण आपण ऐकल नाही तेव्हा दारात आलेली संधी तुम्ही नाकारली त्यामुळेच तुम्हाला राजकीय वनवास आला. असे राजकीय चिमटे पण आ. हेमत पाटील यांनी काढल्यामुळे एकच हंशा पिकला होता. अणखी विशेष म्हणजे नागरिकांत अशी चर्चा होती की, काँग्रेसचे माजी आ.माधवराव पा.जवळगावकर व विद्यमान हिगोली लोकसभाचे खा. नागेश पाटील आष्टीकर यांच्या बाबतीत काहीतरी बोलतील माञ ती अपेक्षा फोल ठरली.