किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट विधानसभेचे लोकप्रिय माजी आ. स्व. प्रदीप नाईक यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम तालुक्यातील ईस्लापूर येथे संपन्न झाला.
माजी आमदार प्रदीप नाईक यांचा दि. 1 जानेवारी 2025 रोजी नविन वर्षाच्या दिवशी पहाटेला दुःखद हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. असून दि. 2 जानेवारी रोजी मुळगाव दहेली तांडा येथे त्याच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अत्यसंस्कार करण्यात आले.
दि. 5 जानेवारी शनिवारी रोजी ईस्लापूर येथील श्री संत सेवालाल महाराज चौकात त्यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम सर्वपक्षीय कार्यकर्त व गावकयाच्या वतीने आयोजीत करण्यात आला होता. यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवत माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करत जीवन चरित्रावर मार्गदर्शन करत श्रद्धांजली अर्पण केली आहे. या श्रद्धांजली कार्यक्रमास सर्वपक्षीय कार्यकर्ते ,व्यापारी बांधव, पत्रकार बांधव, सर्व समाज बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.