नांदेड| जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या भाजपाच्या सदस्य नोंदणी अभियानाला राज्यात उदंड प्रतिसाद मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा सदस्य नोंदणीसाठी ‘ घर चलो अभियान ‘ राबविण्यात येणारा असून दिनांक 10 जानेवारी रोजी सर्व बूथ वर राबविण्यात येणाऱ्या या अभियानात सहभागी होऊन भाजपाची जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करावी असे आवाहन खा. डॉ. अजित गोपछडे यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात भारतीय जनता पार्टीचे जाळे सर्व दूर आणि सर्व व्यापक विणले जात आहे. प्रत्येक शहर , महानगर , गाव , वाडी, तांड्यापर्यंत भारतीय जनता पार्टीची ध्येय धोरणे पोहोचली जात असून देशाच्या प्रत्येक घटकाला विकासाच्या खऱ्या प्रवाहात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व काम करत आहे. जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरलेला भारतीय जनता पक्ष खऱ्या अर्थाने लोकशाहीचा तारक ठरला आहे.
शोषित , पिडीत वंचितांनाही न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे राज्य आणि केंद्र सरकार प्रामाणिकपणे काम करत असल्यामुळे केंद्रात तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचे सरकार स्थापन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी , भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा , केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्रात भाजपाची सदस्य नोंदणी मोठ्या जोरात सुरू आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजपाची सदस्य नोंदणी अधिकाधिक व्हावी या अनुषंगाने प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या सूचनेनुसार दिनांक 10 जानेवारी रोजी प्रत्येक बूथ पातळीवर घरोघरी भाजपाचे सदस्य नोंदणी अभियान पोहोचण्यासाठी घर चलो अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी , लोकप्रतिनिधींनी , कार्यकर्त्यांनी , बूथ प्रमुखांनी सहभागी होऊन भाजपाची सर्वाधिक सदस्य नोंदणी करून घेऊन नवा इतिहास निर्माण करावा असे आवाहनही खा. डॉ. अजित गोपछडे यांनी केले आहे.