Friday, May 22

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Shravani Mathapati awarded 7 medals : श्रावणी मठपती 7 मेडलने सन्मानित

Shravani Mathapati awarded 7 medals : श्रावणी मठपती 7 मेडलने सन्मानित

नांदेड, करियर
नांदेड| विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी अनेक शाळेत विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. यात नांदेड येथील नरहर कुरुंदकर हायस्कूल तर्फे अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात नरहर कुरुंदकर हायस्कूलची इयत्ता आठवीत शिकणारी विद्यार्थिनी कु.श्रावणी सतीश मठपती हिने वार्षिक शाल्येय स्पर्धेत सहभागी होऊन एकूण 7 मेडल पटकावले आहेत. खो-खो मध्ये प्रथम, क्रिकेट मध्ये प्रथम, रनिंग मध्ये प्रथम,थैला रेस प्रथम, नाटक स्पर्धा प्रथम,आनंद नगरी द्वितीय, लिंबू चमचा तृतीय असे एकूण 7 स्पर्धेत आपले स्थान पटकावले आहे. श्रावणी हिने प्रत्येक स्पर्धेत सहभागी होऊन यश संपादित केल्या मुळे शाळेच्या वतीने तिचे अभिनंदन करण्यात आले असून, सर्वस्तरातून श्रावणी हीचे कौतुक होत आहे....
Collector Abhijit Raut : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निरोप द्यायला रिघ लागली

Collector Abhijit Raut : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निरोप द्यायला रिघ लागली

नांदेड, करियर
नांदेड| बदली शासकीय अधिकाऱ्यांच्या आयुष्यातील आकस्मिक, अविभाज्य घटना. मात्र काही अधिकाऱ्यांच्या बदलीने समाजमन हळवे होते. आज कला, क्रीडा, सांस्कृतिक, राजकिय, सामाजिक, प्रशासकीय व पत्रकारिता क्षेत्रातील अनेकांची थबकलेली पाऊले जिल्हाधिकारी कार्यालयात बघायला मिळाली. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत (Collector Abhijit Raut) यांची काल बदली झाली. अडीच वर्षांपासून अधिक न बोलता प्रत्यक्ष काम करणारे एक व्यक्तिमत्त्व नव्या ठिकाणी कार्यसिद्धीसाठी निघाले आहेत. दिलदार ! नांदेडकरांनी आज या कार्यकर्तृत्वाला आदराने सलाम केला. आज दिवसभरात विविध क्षेत्रातील नागरिकांनी एका गुणवान, मितभाषी, कार्यतत्पर अधिकाऱ्याला निरोप दिला. काही पत्रकारांनी यावेळेत सिंहावलोकन केले. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली. गेल्या अडिच वर्षातील एक - एक कामांची यादीच पुढे आली. सुरुवात झाली ती सप्टेंबर 2022 रोजीच्या रुजू होण्यापासून. जिल्हाधिकार...
People’s High School Nanded concluded : पिपल्स हायस्कूल नांदेडच्या १९७७ दहावी बॅचचा स्नेहमेळावा संपन्न

People’s High School Nanded concluded : पिपल्स हायस्कूल नांदेडच्या १९७७ दहावी बॅचचा स्नेहमेळावा संपन्न

करियर, नांदेड
नांदेड| पिपल्स हायस्कूल नांदेडला शिकलेल्या व १९७७ साली दहावीची परीक्षा दिलेल्या, आज साठ पासष्ट वयोगटातील चीरतरुणांचा स्नेहमेळावा कपिला रिसॉर्ट, पुणे येथे नुकताच संपन्न झाला. या स्नेहमेळाव्यात सर्वश्री डॉ. दीपक मांडाखळीकर नांदेड, श्री.अनिल महामुनी पुणे, सौ.स्मिता बोकिल पुणे, श्री.प्रमोद डुब्बेवार मुंबई, सौ.कल्पना व्यहाळकर पुणे, श्री.श्रीकांत अकोलकर नांदेड, श्री.विजय वाघ मुंबई, श्री.अविनाश जोशी पुणे, श्री.अमोल कुलकर्णी अहिल्यानगर, श्री.संभाजी कुबडे पुणे, श्री.शिरिष दडके नाशिक, सौ.प्रमोदिनी येरमाळकर पुणे, श्री.अनिल अमृतवार नांदेड, श्री.विलास देशमुख पुणे, सौ.शकुंतला मोकले नांदेड, श्री.वेंकटेश कवटीकवार पुणे, सौ.निशा कापसे मुंबई, श्री.प्रशांत खरवडकर संभाजीनगर, सौ.प्राजक्ता बर्वे पुणे, सौ.स्वाती पटवर्धंन पुणे आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते. सौ.ज्योत्स्ना डुब्बेवार, सौ.गंगामणी अमृतवार, सौ....
Mrs. Sharvari Bhojankar : कु. शर्वरी भोजनकर यांचा राजभवन मुंबई येथे सन्मान

Mrs. Sharvari Bhojankar : कु. शर्वरी भोजनकर यांचा राजभवन मुंबई येथे सन्मान

नांदेड, करियर
हदगांव, शेख चांदपाशा| भगवान महावीर स्वामी निर्वाण कल्याण महोत्सव समिती, महाराष्ट्र शासनातर्फे 20 ते 30 सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रभर भगवान महावीर स्वामी यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यातील 36 जिल्ह्यांमधील सुमारे 1 लाख 5 हजार सरकारी, निमसरकारी आणि खासगी शाळांतील एकूण 1 कोटी 16 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. महावीर स्वामींच्या शाश्वत कल्याणकारी तत्त्वांचे जागतिक महत्त्व समजावून देण्यासाठी या भव्य मेगा इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक जिल्ह्यासाठी रोख बक्षिसे जाहीर करण्यात आली होती, तसेच राज्यस्तरीय तीन पुरस्कार देखील जाहीर करण्यात आले. यामध्ये उमरखेड येथील युनिव्हर्सल इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी व हदगाव येथील सेवानिवृत्त आदर्श शिक्षक पुरुषोत्तमराव भोजनकर यांची नात कु. शर्वरी प्रज्ञान भोजनकर हिने राज्यस्...
showcase the talents : राज्यातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विशेष स्पर्धा

showcase the talents : राज्यातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विशेष स्पर्धा

नांदेड, करियर, मुंबई
मुंबई| राज्यातील उपयोजित कला (अप्लाईड आर्ट) महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून मुंबईतील सर ज.जी.कला महाविद्यालयासह महाराष्ट्रात असलेल्या उपयोजित कला महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण, प्रभावी याबरोबरच सर्जनशील आणि कलात्मक जाहिरातींच्या संकल्पना, जाहिरात डिझाईन आणि टॅगलाईन अशा तीन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेसाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने केले आहे. सर्जनशील आणि कलात्मक जाहिरातींच्या संकल्पना, डिझाईन आणि टॅगलाईन स्पर्धेच्या प्रवेशिका स्पर्धकांनी दिनांक ५ ते १६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत dgiprdlo@gmail.com या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीने पाठवाव्या. स्पर्धेसाठी आलेल्या प्रवेशिकांचे परीक्षण करून २७ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘मराठी भाषा गौरव दिनी’ विजेत्या स्पर्धकांना पुरस्कार देण्यात येतील...
Inauguration of district level cultural competition : दिव्यांग मुला-मुलींचे जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

Inauguration of district level cultural competition : दिव्यांग मुला-मुलींचे जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

करियर, नांदेड
नांदेड| समाज कल्याण विभाग व नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीने कुसुम सभागृहात आज दि.4 फेब्रुवारीला दिव्यांग मुला-मुलींचा जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन (Inauguration of district level cultural competition) झाले. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव श्रीमती दलजीत कौर जज होत्या. यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार ओम प्रकाश गिल्डा, डॉ.अजय मालपाणी, बापू दासरी आदींची उपस्थिती होती. जिल्ह्यातील एकूण 55 शाळांनी सहभाग नोंदवला पारंपारिक लोककला,नृत्य,गायन या सह विविध कला गुणांचे अविष्कार विद्यार्थ्यांनी सादर केले...
DR. M. A. Rahman : हिमायतनगरचे भूमिपुत्र डॉ. एम. ए. रहमान यांना वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्र

DR. M. A. Rahman : हिमायतनगरचे भूमिपुत्र डॉ. एम. ए. रहमान यांना वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्र

करियर, नांदेड
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगरचे भूमिपुत्र डॉक्टर एम. ए. रहमान इएनटी स्पेशालिस्ट यांना गुरुगोविंद सिंगजी मेमोरियलच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिनांक 26 प्रजासत्ताक दिनी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा अधिकारी अभिजीत राऊत तसेच डॉक्टर निळकंठ भोसीकर जिल्हा शल्य चिकित्सक यांनी प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा यथोचित गौरव केला. त्याबद्दल डॉक्टर एम ए रहमान हाजी मोहम्मद मुर्तुजा सेठ यांचे हिमायतनगर तालुक्यासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यात कौतुक केले जात असून, अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सदर भव्य व दिव्य कार्यक्रमास डॉक्टर पेरके सर व डॉक्टर सौ भोसीकर मॅडम तसेच डॉक्टर बुट्टे सर व अनेक आरोग्य कर्मचारी वृंद उपस्थित होते. डॉक्टर एम ए रहमान यांना प्रशस्तीपत्र मिळाल्याबद्दल हिमायतनगर येथील माजी नगरसेवक अन्वर खान पठाण, अश्रफ खान, जामा मजीत कमिटीचे अध्यक्ष मुजीब खान, मोहम्मद...
HUDCO ; विघानिकेतन प्राथमिक व माध्यमिक शाळा हडको वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न

HUDCO ; विघानिकेतन प्राथमिक व माध्यमिक शाळा हडको वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न

नांदेड, करियर
नवीन नांदेड l हडको येथील विघानिकेतन शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन समलेंन‌ निमित्ताने ‌आयोजीत सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये शाळेतील सहभागी विद्यार्थी व विद्यार्थिनी विविध सामुहिक व‌ वैयक्तिक नृत्यावर अनेक गितातुन नृत्य सादर केली यावेळी या स्नेहसंमेलनचे ऊघ्दाघाटन‌ युवा नेते संजय पाटील घोगरे यांनी केले. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम अंतर्गत वार्षिक स्नेहसंमेलन हडको येथील विघानिकेतन प्राथमिक व माध्यमिक शाळेच्ये 3 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक म्हणून युवा नेते संजय पाटील घोगरे, नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तिरूपती पाटील घोगरे, कार्याध्यक्ष रमेश ठाकूर व पत्रकार दिंगाबर शिंदे यांच्यी उपस्थिती होती, यावेळी संजय पाटील घोगरे यांनी उद्घाटन करून स्नेह संमेलन प्रसंगी स्नेह संमेलन मधुन अनेक विद्यार्थी कलाकार म्हणून पुढे आले असून विध्यार...
Waghala ; 50 वा जिल्हास्तरीय स्काऊट गाईड व कब, बुलबुल जिल्हा मेळाव्याचे आश्रम शाळा वाघाळा नांदेड येथे आयोजन

Waghala ; 50 वा जिल्हास्तरीय स्काऊट गाईड व कब, बुलबुल जिल्हा मेळाव्याचे आश्रम शाळा वाघाळा नांदेड येथे आयोजन

नांदेड, करियर
नवीन नांदेड l नांदेड भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा कार्यालय नांदेड व जिल्हा परिषद शिक्षण विभाग, नांदेड यांच्या वतीने जिल्हास्तरीय ५० वा जिल्हा मेळावा दि. 4 ते 7 फेब्रुवारी 25 या कालावधीत महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, वाघाळा नांदेड ता. जि. नांदेड येथे आयोजित करण्यात आलेला आहे. स्काऊटस आणि गाईडस ही निधर्मी, अराजकीय व गणवेषधारी सर्वात मोठी चळवळ आहे. ही चळवळ रान 1907मध्ये इंग्लडमध्ये सुरु झाली असून आजमितीस जगातील 210 देशात सुरु आहे. या चळवळीच्या माध्यमातुन देशाचा भावी नागरीक सुजाण, सुसंस्कत, स्वावलंबी व आत्मनिर्भर घडावा यासाठी ही चळवळ सातत्याने कार्य करीत आहे. या चळवळीत जगातील चार कोटी पेक्षा जास्त युवक युवती सहभागी असून भारतातील 55 लक्ष तर महाराष्ट्र राज्यात 15 लक्ष सदस्यांचा त्यात समावेश आहे. तसेच नांदेड जिल्हयातील 35 हजार सदस्य आहेत. या चळवळीची मुलतत्वे लक्षा...
Jayawardhan Bhosikar ; पत्रकार जयवर्धन भोसीकर धम्मसारथी पुरस्काराने सन्मानित

Jayawardhan Bhosikar ; पत्रकार जयवर्धन भोसीकर धम्मसारथी पुरस्काराने सन्मानित

नांदेड, करियर
नांदेड l इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार जयवर्धन भोसीकर यांना लोकजनजागृती बहुदेशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने धम्मसारथी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शहरातील पृथ्वी लॉन्स मंगल कार्यालयात दिनांक 2 फेब्रुवारी रोजी धम्मसारथी गौरव पुरस्कार व बौद्ध वधू वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन विजयकुमार सितळे यांनी केले होते. या कार्यक्रमास भदंत पंय्याबोधी महाथेरो , प्रशांत भाऊ ननावरे, डॉ. संगीता घुगे, डॉ. करुणाताई जमदाडे,सोनू शंखपाळ,रामकुमार सोनवणे, अशोक कापशीकर, सुभाष काटकांबळे, डीपी गायकवाड, अशोक हटकर, रवी पंडित.यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार जयवर्धन भोसीकर यांना पत्रकारिता क्षेत्रातून बुद्ध धम्माचा प्रचार व प्रसार यासह विविध धम्म कार्यात सहभाग याकरिता धम्मसारथी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.भोसीकर यांना यापूर्वी आंबेडकरी चळवळीतील तु...
error: Content is protected !!