हिमायतनगर| हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर येथील ग्रंथालय विभाग यांच्या तर्फे दिनांक 01 जानेवारी ते 15 जानेवारी 2025 दरम्यान वाचन संकल्प महाराष्ट्राचा या पंधरवडा कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यानिमित्ताने आज दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी महाविद्यालयामध्ये ग्रंथालय विभागाद्वारे ग्रंथ प्रदर्शन संपन्न.
सुरुवातीला महाविद्यालयातील प्राचार्या डॉ .उज्ज्वला सदावर्ते यांच्या हस्ते जयवंतराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्यानंतर मंचावरील मान्यवरांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व रूपरेषा प्राध्यापक गुंडाळे सर यांनी मांडली. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने ग्रंथ प्रदर्शनाचा आस्वाद घेतला. ग्रंथ प्रदर्शनामध्ये विविध कादंबरी कथा विविध साहित्य समाज सुधारक यांच्या विषयी ग्रंथ ठेवण्यात आले होते.
वाचन संकल्प महाराष्ट्राचा आज ग्रंथ प्रदर्शन चा आस्वाद मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते . खरोखरच वाचन संस्कृती आपण प्रत्येकाने जोपासली पाहिजे .कार्यक्रमासाठी अथक परिश्रम शेख शहेनाज मॅडम ,विश्राम देशपांडे,आशिष दिवडे , एल एस पवार ,प्रवीण सावंत आदीने घेतले .