कंधार, सचिन मोरे| कंधार तालुक्यात जल जिवन मिशनच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी असून तालुक्यातील सर्व सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,पाणी पुरवठ्याचे कार्यकारी अभियंता, गुत्तेदार, सर्व विभागाचे अधिकारी,सरपंच,ग्रामसेवक या सर्वांची एक संयुक्त विशेष बैठकीचे आयोजन लवकरच करून तालूक्यातील जनतेस पाणी टंचाई भासू नये यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही लोहा कंधार विधानसभेचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली.
कंधार शहरातील नगरेश्वर मंदीर येथे संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा बैठकीचे आयोजन दि ११ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे होते. यावेळी व्यासपीठावर माजी जि.प सदस्य हंसराज पाटील बोरगावकर, ज्येष्ठ नेते बाबुराव केंद्रे उमरगेकर , स्वप्निल पाटील लुंगारे, कृ.उ.बा चे सभापती संजय देशमुख, मा. प्राचार्य किशनराव डफडे, माजी नगराध्यक्ष मोहम्मद जफोरोद्दीन, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष भगवान राठोड, मधुकर डांगे, मनोहर पाटील भोसीकर, गट विकास अधिकारी महेश पाटील, पाणी पुरवठ्याचे उपअभियंता दिपक बनसोडे, प्रभारी तहसिलदार भोसीकर, पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव, ग्राम सेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष विलास नारनाळीकर, माजी अध्यक्ष गंगाधर कांबळे, जि.प उपअभियंता देविदास बसवदे, बाळू पाटील लुंगारे, मामा गायकवाड, राजकुमार केकाटे, दत्तात्रय चंदन फुले,शंकरराव नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार चिखलीकर म्हणाले की, कंधार तालुका हा डोंगराळ असून तालुक्यातील अनेक तांड्यावर पाणी टंचाईच्या समस्या आहेत. त्या भागात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात आहे ही टंचाई दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांनी सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी समन्वय साधावा. सरपंचास विश्वासात घ्यावे. कार्यालयीन कामानिमित्त कार्यालयात आले असता सर्व सामान्य जनतेला वेठीस धरू नये. तालुक्यातील आगामी काळात पाणी टंचाई भासू नये यासाठी सरपंच ग्रामसेवक व पंचायत समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी एकजुटीने कामे करावी. मतदारसंघातील सर्व कामे दर्जेदार व्हावीत यासाठी प्रामाणीक प्रयत्न करणार असल्याचा विश्वास आमदार चिखलीकर यांनी व्यक्त केला.
बैठकीस गैरहजर कर्मचाऱ्यांची गय करणार नाही – आमदार चिखलीकर
आगामी काळात तालुक्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी एका विशेष बैठकीचे आयोजन लवकरच करणार असून या बैठकीस सर्व अधिकारी कर्मचारी सर्व विभागाचे खाते प्रमुख यांनी बैठकीस हजर राहावे. प्रोटोकॉल पाळावा गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा आमदार चिखलीकर यांनी यावेळी दिला.