मुखेड, बस्वराज वंटगिरे l मुक्रमाबाद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात भूगोल विभागामार्फत भूगोल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक इनामदार यांच्या हस्ते पृथ्वीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रमुख अतिथी प्रा. डॉ. भरत मुस्कावाड, प्रा. मुकुंदराज जाधव तर प्रमुख वक्ते प्रा. गंगाधर वाघमारे हे होते.

शिवाय महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक डॉ. मौलाना सय्यद, डॉ. नारायण पांचाळ व डॉ. रामदास मादळे व सर्व प्राध्यापक परिश्रम घेतले.
