उस्माननगर, माणिक भिसे l वाचक संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम निमित्त कलंबर बु. ता, लोहा येथील कै, उमाजीराव गोरे सार्वजनिक वाचनालय कलंबर बु. येथील वाचनालयामध्ये वाचन पंधरवडा उत्साहात साजरा करण्यात आला.

या निमित्ताने वाचनालयात विद्यार्थ्यांना विविध भाषातील पुस्तके वाचण्याची संधी मिळाली. ३ जानेवारी रोजी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त वाचन पंधरवडा या कार्यक्रमात जिप हायस्कूल कलंबर बु. मुख्याध्यापक जी एम कोरे. यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व पटवून दिले, ग्रंथ हे ज्ञानाचा अथांग सागर आहेत विद्यार्थ्यांनी वाचन करून आपल्या ज्ञानात भर घालावी असे आवाहन करण्यात आले.

विविध भाषातील पुस्तके, कादंबरी , कथा , कविता संग्रह, स्पर्धा परीक्षा पूस्तके,वूत्तपत्र वाचनालयात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होती. यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या आवडीची पुस्तके वाचण्याची संधी मिळाली या कार्यक्रमाव्दारे विद्यार्थ्यांमध्ये वाचणाऱ्याची आवाड निर्मिती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. वाचण केल्याने विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढते शब्द संग्रह समृध्द होतो. आणी विचारशक्ती तीक्ष्य होते.

कार्यक्रमाचे संचालन वाचनालय चे अध्यक्ष ग्यानसिंह ठाकूर यांनी केले. तर आभार प्रदर्शन संस्थेचे संस्थापक ग्रंथपाल उमाकांत गोरे यांनी केले. या कार्यक्रमात अध्यक्ष जिप हायस्कूल कलबर बु मुख्याध्यापक जी एम कोरे, जी.जी.ठाकूर, नामदेव तारु, सतिष मानेलू, संजय सिंह कच्छवा, आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
