नांदेड| पोलिसांच्या विशेष पथकाने घरगुती वापराचे गॅस अवैधरित्या अॅटोरिक्षामध्ये इंधन म्हणुन वापरणाऱ्या इसमां विरूध्द कार्यवाही (Action against persons illegally using LPG as fuel in auto-rickshaws) करून 24 गॅस सिलेंडर सह 2 लक्ष 61 हजार 950 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कार्यवाहीबद्दल गैस सिलेंडरमधील गैसची काळ्या बाजारात विक्री करू पाहणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत सर्व विशेष पथके व प्रभारी अधिकारी यांना जिवनावश्यक वस्तु अधिनियम अन्वये कार्यवाही करण्याबाबत आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार हे आज दिनांक 28.01.2025 रोजी पोलीस स्टेशन इतवारा हददीत पेट्रोलीग करीत असताना गुप्त बातमी मिळाली. देगलुर नाका MSEB कार्यालया समोर घरगुती वापरासाठी वापरले जाणारे भारत गॅस / एच.पी. गॅस सिलेंडर मधुन इलेक्ट्रीक मोटार व पंपाच्या साहयाने गॅस काढुन ऑटोमध्ये भरत आहेत अशी माहिती मिळाली.

यावरून विशेष पथकाने मोहसीन खान मुस्तफा खान पठाण, वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. मोहम्मदिया कॉलनी, देगलुर नाका नांदेड 2. सय्यद नवाज सय्यद खुर्शिद वय 22 वर्षे व्यवसाय ऑटो चालक रा. मदिनानगर देगलुर नाका, नांदेड या ठिकाणी जावुन छापा मारला असता 1) भारत व एच.पी. कंपनीचे 24 गॅस सिलेंडर किंमती 91,800/-रूपये, 2) सोनेल डिएक्स कंपनीची एक एच.पी. इलेक्ट्रीक मोटार किंमती 15,000 /- रूपये, 3) बजाज कंपनीचा तीन चाकी अॅटो किंमती 1,50,000/- रूपये, 4) एक काळया रंगाचे इलेक्ट्रीक वनज काटा किंमती 3,000/- रूपये, 5) नगदी 2150/-रूपये असा एकूण 2,61,950/- रूपयाचा मुद्देमाल व एक अॅटो मिळुन आल्याने ते जप्त करून पोलीस स्टेशन इतवारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हि कार्यवाही अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड (IPS), खंडेराव धरणे, अपर पोलीस अधिक्षक भोकर,सुरज गुरव, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड, यांचे मार्गदर्शना खाली व्ही.एस.आरसेवार, सपोनि, विशेष पथक नांदेड, पोकों/शेख खलिल, विलास बोराळे, राजेश नागलपल्ले, चालक पोहेकों मारोती सोनटक्के यांनी केली आहे. विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी चांगली कामगीरी केल्याने वरिष्ठांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
