Action against persons illegally using LPG as fuel in auto-rickshaws : अवैधरित्या अॅटोरिक्षामध्ये इंधन म्हणुन गैस वापरणाऱ्या इसमां विरूध्द कार्यवाही
नांदेड| पोलिसांच्या विशेष पथकाने घरगुती वापराचे गॅस अवैधरित्या अॅटोरिक्षामध्ये इंधन म्हणुन वापरणाऱ्या इसमां विरूध्द कार्यवाही (Action against persons illegally using LPG as fuel in auto-rickshaws) करून 24 गॅस सिलेंडर सह 2 लक्ष 61 हजार 950 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कार्यवाहीबद्दल गैस सिलेंडरमधील गैसची काळ्या बाजारात विक्री करू पाहणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत सर्व विशेष पथके व प्रभारी अधिकारी यांना जिवनावश्यक वस्तु अधिनियम अन्वये कार्यवाही करण्याबाबत आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार हे आज दिनांक 28.01.2025 रोजी पोलीस स्टेशन इतवारा हददीत पेट्रोलीग करीत असताना गुप्त बातमी मिळाली. देगलुर नाका MSEB कार्यालया समोर घरगुती वापरासाठी वापरले जाणारे भारत गॅस...
