नांदेड| येथील बुद्ध किर्ती चॅरिटेबल ट्रस्ट सहयोग नगर नांदेड च्या वतीने दिल्या जाणारा प्रतिष्ठेचा भीम योद्धा पुरस्कार (“Bheem Yoddha” Award 2025 Announced) द्वितीय वर्ष 2025 घोषित करण्यात आला असून पुरस्कार वितरण समारंभ “माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार सहयोग नगर, नांदेड” येथे दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी ठीक 5.00 वाजता मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

सदरील पुरस्कार भीमा कोरेगाव क्रांती दिन आणि भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित केल्या जात असून कार्यक्रमात सैन्यदलातील सेवानिवृत्त सैनिक, भारतीय बौद्ध महासभेतील समता सैनिक, आणि पोलीस दलातील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी यांना त्यांनी केलेल्या राष्ट्रीय व सामाजिक कार्याबद्दल प्रदान केल्या जातो. पूजापाठ पूज्य भिक्खू शीलरत्न थेरो करतील. सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष आर. पी. कोकरे सर (माजी मुख्याध्यापक तथा आदर्श शिक्षक पुरस्कार महाराष्ट्र शासन प्राप्त), विशेष उपस्थिती अलंकृता कश्यप बगाटे (जिल्हा कोषागार अधिकारी, नांदेड) स्वागताध्यक्ष रमेशराव सूर्यवंशी, प्रमुख नियोजक साहेबराव गायकवाड, विशेष उपस्थिती प्रफुल दादा सावंत, प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे,सुभाषदादा काटकांबळे,हीरामनराव वाघमारे, डॉ.भीमराव हाटकर, इंजि. भरत कांनिंदे, एस. एन. परघने, डी. डी. भालेराव, मा. रविकिरण जोंधळे, सा. ना. भालेराव,अशोकराव गायकवाड, कुमार कुरतडीकर, डॉ. रवी सरोदे, अशोकराव जोंधळे, उमेश ढवळे, प्रा. राज आटकोरे,क्रांतीकुमार पंडित असणार आहेत. “भीम योद्धा” पुरस्कार निवड समिती मध्ये युवराज मोरे, मा. देवराव झगडे, मा. विजयकुमार उजेडकर यांनी काम पाहिले.

भीम योद्धा पुरस्कार वितरण कार्यक्रमात महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक कु.क्रांती उजगरे पुणे, रविराज भद्रे आणि उपा. मेघा गायकवाड यांचा बुद्ध व भीम गीतांचा कार्यक्रम देखील संपन्न होणार आहे. भीम योद्धा पुरस्कार घोषित झालेल्या मान्यवरांची नावे पुढील प्रमाणे आहेत. भारतीय सेना: उपा. संभाजी बाबुराव रणवीर, सुभेदार,उपा. सुरेंद्र तुकाराम गोवंदे, नायक उपा. पंडीत गोविंद पवार, नायक उपा.सुभाष निवृत्ती हाटकर, नायकउपा. संभाजी सत्ताजी सरपाते, नायब सुभेदार उपा. सुरेश नरहरी हनुमंते हवालदार उपा. साहेबराव गणपतराव चौदंते, नायक उपा. बालाजी पिराजी कदम, नायक उपा. बाबुराव शंकरराव हाटकर, हवालदार उपा. रोहिदास रामजी गजभारे, शिपाई बी.एस.एफ. समता सैनिक दल उपा. संतराम नामदेवराव शिनगारपुतळे, मेजर उपा. भीमराव कचरू सावते, समता सैनिक उपा. अशोक तुकाराम कांबळे, समता सैनिक उपा. ज्ञानोबा माणिकराव आचार्य, मेजर उपा. गोदावरी निवृत्ती सावते, समता सैनिकउपा. आनंद शेकोबा झडते, मेजर उपा. सदाशिव नारायणराव हनुमंते, कंपनी कमांडर उपा. रामदास लालू कांबळे, कंपनी कमांडर उपा. माणिकराव चिंतामण इंगळे, समता सैनिक उपा. संतोष विठ्ठलराव दुंडे, मेजर :

पोलिस दल उपा. गौतम रामराव गायकवाड, ASIउपा. गोविंद पांडुरंग कावळे, पोलीस हवालदारउपा. विद्यासागर विठ्ठलराव वैद्य, ASIउपा. उत्तम कोंडीबा हनमंते, ASI उपा. जयराम केरबा सोनकांबळे, ASI उपा. उद्धव लक्ष्मणराव कांबळे, ASI उपा. गंगाधर केरबा कांबळे, PSI उपा. गौतम शंकर गवारे, ASIउपा. गौतम जयराम भंडारे, ASIउपा. बालाजी मोहन पवार, ASI याना सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती बुद्ध किर्ती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष- रमेश कोकरे यांनी दिली आहे. उपाध्यक्ष – साहेबराव गायकवाड, सचिव- राजेश बिऱ्हाडे, सहसचिव-प्रवीण कुपटीकर, कोषाध्यक्ष- सुभाष मल्हारे, सदस्य – रमेशराव सूर्यवंशी आणि सदस्य- भीमराव सोनाळे तसेच सामाजिक कार्यकर्ते सुरेशराव महाबळे, मुख्याध्यापक रामराव झगडे, साहेबराव पुंडगे, इंद्रजित नरवाडे आणि माता रमाई आंबेडकर महिला मंडळाच्या सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बुद्ध किर्ती चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने सर्व बौद्ध जणांना केले आहे.
