किनवट, परमेश्वर पेशवे | इस्लापूर ग्रामपंचायत पद भरती लिपिक वर्ग चार या पदासाठी परीक्षा निकाल प्रक्रिया पूर्ण होऊन तब्बल सहा महिने पूर्ण झाले तरी अद्याप पर्यंत इस्लापूर ग्रामपंचायत (Islapur gram panchayat ) ने लिपिक पदासाठी कुठलाही निकाल न दिल्याने परीक्षार्थी सत्येश्वर परमेश्वर पेशवे यांनी निकाल देण्यासंदर्भात इस्लापूर ग्रामपंचायत कार्यालय समोर आज दिनांक 26 जानेवारी 2025 पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे .

या उपोषणास आज तब्बल तीन दिवस झाले. त्यामध्ये उपोषणकर्त्याची प्रकृती खालावत जात असताना सुद्धा ग्रामपंचायत पदाधिकारी यांना उपोषणकर्त्यास भेट देण्यास वेळ मिळत नाही ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यां मध्ये सर्वच अलबेल असल्याने व त्यांच्यात समन्वय नसल्यामुळे व पंचायत समिती स्तरावरील अधिकाऱ्यांचा ताळमेळ लागत नसल्याने उपोषणकर्त्यांना भेट देण्यासाठी वेळ मिळत नाही ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.

त्यातच विस्तार अधिकारी कांबळे यांनी उपोषणार्थिस तिसऱ्या दिवशी सायंकाळी साडेसहा वाजता भेट दिली. व सदरील प्रकरण उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात सुनावणी झाल्याने आम्हाला कुठलाही निकाल देता येत नाही तेव्हा तुम्ही अशाच पद्धतीने उपोषण सोडा अशी अकलेची तारे उडवून उपोषण ठिकाणाहून कुठलीही ठोस पावली न उचलता पळ काढला जिल्हा परिषद च्या कर्तबगार सीईओ मीनल करणवाल यांनी आता या बाबीकडे पारदर्शकपणे लक्ष वेधणे गरजेचे बनले आहे.

सदरील परीक्षा ही ग्रामपंचायत नियमावली प्रमाणे घेण्यात आली व या परीक्षेचे पेपर तपासणी व निकाल घोषित करण्याची प्रक्रिया 15 ऑगस्ट 2024 रोजी ठेवण्यात आली असता परीक्षार्थींच्या प्रत्यक्ष समोरा समोर उपस्थित दर्शनी पेपर तपासणी करण्यात आली होती. या सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यात आल्या मात्र या लिपिक पदाचा निकाल सूचना फलकावर लावण्यात आला नाही प्रक्रिया घोषित करण्या संदर्भात दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी सत्तेश्वर पेशवे यांनी लेखी निवेदनाद्वारे मागणी केली.

पण ग्रामपंचायतिने कुठलाही प्रतिसाद दिला नसल्याने ग्रामपंचायतच्या बेबनावामुळे पदाधिकाऱ्यांच्या एकमत न झाल्याने मुद्दामहून निकाल प्रक्रिया रखडल्या. अखेर 26 जानेवारी 2025 रोजी उपोषणकर्ते सत्येश्वर परमेश्वर पेशवे यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला सदरील उपोषणार्थीस उपोषणाचा आजचा चौथा दिवस असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी काय निर्णय देतील याकडे आता उपोषणकर्त्याची लक्ष लागले.