नांदेड| नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील पोलीस ठाणे कुंडलवाडी येथील मोक्का गुन्ह्यातील (Mokka crime accused) 13 वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीला परभणी येथुन स्थानिक गुन्हे शास्थानिक गुन्हेच्या पथकाने अटक केली आहे.

हि कार्यवाही अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली खंडेराय पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड, उदम, व्हि. एच. घोगरे, सहायक पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा नांदेड, बळीराम दासरे, पोलीस उप निरीक्षक, नियंत्रण कक्ष, नांदेड यांच्यासह पोलीस अंमलदार सहा पोलीस उप निरीक्षक गुंडेराव करते नेमणुक पौत्तीस ठाणे लिंबगांद, देवा चव्हाण, तानाजी घेळगे, मोतीराम पवार नेमणुक द. वि. पथक, राजू बोधगरि, इसराईल मोक्ष, अनिल बिरादार, साहेबराव कदम खंडणी विरोधी पथक, अकबर पठाण, मिलींद नरचाग नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड व राजेंद्र सिटीकर, दिपक ओढणे नेमणूक सामबर सेल नांदेड यांनी केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पोलीस ठाणे कुंडलवाडी गुरनं 01/2011 कलम 3(1)(2)13 (2)13 (4) संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम मधीत आरोपी नामे छत्रपती ऊर्फ शियानी ऊर्फ पिंटू ऊर्फ बालाजी पि.रामा ऊर्फ रामजी भोसले वय 39 वर्षे रा.पिपळगाव ता.लोहा जि. नांदेड सध्या इंदिरानगर, लोहा जि. नांदेड हा गुन्हा पडल्यापासुन फरार असल्याने आरोपीचे शोधकामी माहितीगार अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक करणे बाबत अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोत्तीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांना आदेशित केले होते. त्यावरुन उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड येथील विठ्ठल घोगरे सहायक पोलीस निरीक्षक व नियंत्रण कक्ष येथील पोलीस उप निरीक्षक बळीराम दासरे व पोलीस अंमलदार यांचे पथक तपार करुन, त्यांना नमुद गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेणे बाबत आदेशित केले होते.

त्यावरुन विठ्ठल घोगरे सहायक पोलीस निरीक्षक यांनी त्यांचे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेसह रात्रंदिवस अथक परिश्रम घेवुन, गोपनिय बातमीदार नेमुन गुप्त बातमीदारांच्या माहितीवरुन व सायबर सेल ने पुरविलेल्या तांत्रिक माहितीवरून सदर गुन्ह्यातील आरोपी हा परभणी परिसरात नाव बदलुन व बदललेल्या नावाचे नविन आधार कार्ड तपार करुन परभणी जिल्ह्यात राहत असलेबाबत खात्रीशिर माहिती प्राप्त झाल्याने सदर पथकाने परभणी येथे जावुन सदर गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेतला असता सदर गुन्हातील आरोपी नामे छत्रपती ऊर्फ शिवाजी ऊर्फ पिंटू ऊर्फ बालागी पि.रामा ऊर्फ रामजी भोसले यम-39 वर्ष रा. पिपळगाव ता.लोहा जि. नांदेड सध्या इंदिरानगर, लोहा जि. नांदेड यास पुर्णा तालुक्याच्या हद्दीतुन ताब्यात घेण्यात पोलीस पथकास यश आले आहे.

नमुद आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्द्राबाबत विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केल्याने आरोपी नामै छत्रपती ऊर्फ शिवाजी ऊर्फ पिटु ऊर्फ बालाजी पि.रामा ऊर्फ रामजी भोसले वय-39 वर्षे रा. पिंपळगाव ता.लोहा जि. नांदेड सध्या इंदिरानगर, लोहा जि. नांदेड पास पुढील तपासकामी पोलीस ठाणे कुंडलवाडी पांचे स्वाधिन करण्यात आले आहे. सदर गुन्द्रात 13 वर्षापासुन फरार असलेले आरोपीस ताब्यात घेवुन नांदेड पोलीसांनी उत्कृष्ट कामगीरी केली आहे. त्याबद्दत मा. पोलीस अधीक्षक साहेब यांनी त्यांचे कौतुक केले आहे.