नांदेड| अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी नांदेड शहरात तसेच जिल्ह्यामध्ये शांतता व सूज्यवस्था अबाधित राखण्यासाठी नांदेड जिल्हयातील गुन्हे अभिलेखावरील सक्रिय तसेच वारंवार गुन्हे करणारे सराईत आरोपीची यादी तयार करुन्, आरोपी विरुध्द प्रतिबंधात्मक उपाययोजना ( MPDA for one year) करण्यासंबंधाने सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सुचना दिलेल्या होत्या.

नांदेड जिल्हयातील गुन्हेगारावर वारंवार प्रतिबंधात्मक कार्यवाही करुन सुध्दा त्यांचे वर्तणात सुधारणा होत नसल्याने नांदेड जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेदाराकडून गुन्हेगाराना स्थानबद्ध करण्यासंबंधाने MPDA प्रस्तावाची कार्यवाही चालु आहे. MPDA अंतर्गत सन 2024 मध्ये एकुण 13 रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारानों कारागृहामध्ये “स्थानबध्द” करण्यात आले असून चालू वर्षामध्ये अतिष गंगाधर शिंदे या सराईत गुन्हेगारास कारागृहामध्ये ‘स्थानबध्द करण्यात आले आहे. तसेच शहरात तसेच जिल्ह्यामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, तसेच कायद्याचा आदर करणारे शांतता प्रिय नागरीकांना त्रास देणारे गुन्हेगारांवर पोलीसांची बारकाईने नजर असून अशा गुन्हेगारांवर स्थानबध्द’ सारखी कठोर कार्यवाही करण्यात येत आहे.

सराईत गुन्हेगार नामें अतिष गंगाधर शिंदे या गुन्हेगाराविरुद्ध, घातक हत्याराचा वापर करुन जिवे ठार मारण्याच्या प्रयत्नासहित जबरी चोरी, खूनाचा प्रयन, अश्लील शिवीगाळ करून नुकसान करणे, दुखापत करणे, गृह आगळीक दुखापत करणे, अवैद्य शस्त्र बाळगणे व त्याचा वापर करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे दखलपात्र गुन्हे दाखल असल्याने ओमकांत चिंचोलकर, पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण यांचेकडून त्याचे विरुध्द MPDA अधिनियमाप्रमाणे स्थानबध्द करणे बाबतचा प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक, नांदेड यांचेकडे सादर करण्यात आला होता.

अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी सदर MPDA प्रस्तावमधील आरोपीस एक वर्षाकरीता स्थानबध्द करण्याबाबतची शिफारस मा. जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांचेकडे केली होती. त्यावरुन अभिजित राऊत, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांनी सदर प्रस्तावातील गुन्हेगार हे धोकादायक व्यक्ती सिध्द झाल्याने आरोपी अतिष गंगाधर शिंदे, वय 29 वर्षे, व्यवसाय बेकार रा.धनेगांव, ता.जि. नांदेड यास एक वर्षाकरीता मध्यवर्ती कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे MPDA कायद्याअंतर्गत स्थानबध्द करण्याबाबतचे दिनांक 25/01/2025 रोजी आदेश पारीत केले आहेत. त्यास आज रोजी ताब्यात घेवून कारागृहामध्ये बंद करण्यात आले आहे.
