नवीन नांदेड l ज्योतीबा फुले सेवा ट्रस्ट नांदेड संचलित, निवासी अंध विद्यालय,वसरणी नांदेड या शाळेनी उतुंग यश प्राप्त केले आहे.

राष्ट्रीय दृष्टीहिन संघ महाराष्ट्र यांच्या तर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 35 वा अंध कल्याण व शैक्षणिक सप्ताह दिनांक 08 जानेवारी 2025 ते 12 जानेवारी 25 या कालावधीत तुळजा भवानी मंगल कार्यालय, अकोला रोड, कारंजा (लाड) जि.वाशिम येथे संपन्न झाला. या अंध कल्याण सप्ताहमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास 20 शाळा सहभागी झाल्या होत्या. या शाळांमधुन निवासी अंधविद्यालय, वसरणी नांदेड या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

त्यामध्ये कु.स्नेहल मनोज काला-इग्रंजी ब्रेल वाचन (प्रथम क्रमांक), हिंदी ब्रेल वाचन (द्वितीय क्रमांक) काव्य वाचन (तृतीय क्रमांक), प्रबुध्द भद्रे – मराठी ब्रेल वाचन (तृतीय क्रमांक), गौरी मुळे -सुगम संगित गायन मध्ये (द्वितीय क्रमांक) व मनाचे श्लोक पाठांतर तिसरा क्रमांक, यश हनवते यांनी वकृत्व स्पर्धा प्रोत्साहनपर पारितोषीके पटकावलीत. त्याच बरोबर भावना लिंबाळकर, परमजितसिंघ रामगडीया, आनंदा म्यानेवार, तेजस्वीनी गुंठे, ज्ञानेश्वर भोंग, विरेंद्र धुमाळे, रुद्र कदम आदी अंध विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला. इयत्ता 5 वी ते 7 वी गटामध्ये गुंणांकणामधुन संपूर्ण महाराष्ट्रातुन द्वितीय ट्रॉफी मिळवली.

तसेच बियोंड व्हीजन फाऊंडेशन व एन.ए.बी. जिल्हा शाखा लातूर यांनी आयोजित केलेल्या ऑनलाईन ब्रेलवाचन स्पर्धा वयोगट 11 ते 20 मध्ये प्रबुध्द भद्रे यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. त्याच प्रमाणे लुई ब्रेल यांच्या जयंतीच्या अनुषंगाने राष्ट्रीय दृष्टीहिन संघ महाराष्ट्र विभागीय शाखा छत्रपती संभाजीनगर यांनी ऑनलाईन सुगम गित गायन स्पर्धा आयोजित केल्या होत्या या स्पर्धेत गौरी मुळे प्रथम व भावना लिंबाळकर द्वितीय क्रमांक पटकावला.या दोंघीचे स्थानीक आमदारांनी बक्षिस देवून त्यांचा सन्मान केला.

या यशामागे मुलांची तयारी करुन घेणारे विशेष शिक्षक संजय पाटील, भास्कर अनेराये, पंकज शिरभाते, रामराव जोजार, वसुधा निकम, सुरेश होळंबे, मनोजकुमार कलवले, बलभिम केंद्र आदी शिक्षकांनी उत्कृष्ट तयारी केल्यामुळे हे प्राप्त करता आले.
या उतुंग यशाबदल जिल्हयाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी मा. सतेंद्रजी आऊलवार,तसेच संस्थेचे संस्थापक श्री. विठठलराव गुटटे, संचालक. नागेश गुटटे, शाळेचे मुख्याध्यापक बाबाराव इबितवार यांनी या सर्वांचे कौतुक केले आहे. या यशामागे नामदेव इंगळे,रंजना सातोरे, संतोष सावतेआदींनी सहकार्य केले.