नवीन नांदेड l जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी संचालित शिवाजी विद्यालय सिडको नांदेड या शाळेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते.

शिवाजी माध्य. व उच्च माध्य. विद्यालय,सिडको नवीन नांदेड हे विद्यालय नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी नांदेड जिल्हयात नेहमी अग्रेसर असते.गेल्या ३ वर्षांपासून सलग विमानाने गगनभरारी घेत यंदाही सदरील सहलीसाठी विद्यार्थी व पालक यांनी मोठया प्रमाणात पसंती देत ही सहल यशस्वीपणे घडवून आणत विद्यार्थीना विमानभरारीचा अगदी लहान वयातच एक अविस्मरणीय आनंद मिळवून दिला.

सदरील सहलींतर्गत विद्यार्थ्यांनी दि.१२ जानेवारी २०२५ रोजी ‘नांदेड ते हैदराबाद’ हा विमान प्रवास केला व त्यांना ‘रामोजी फिल्म सिटी’ येथे मुक्कामी नेण्यात आली. विद्यार्थ्यांनी सदरील फिल्म सिटी मध्ये दि.१३ जानेवारी २५ रोजी हवामहल,मुगल गार्डन, रामोजी स्टुडिओ,कृपालू गुफा, अंतराळ यात्रा, बाहुबली चित्रपट सेट, चित्रपट मॅजिक शो,फिल्मी दुनिया,चित्रपट चित्रिकरण, विविध प्रकारचे स्टेज शो,लाइव्ह शो इ. बाबींचा आनंद घेत त्याच्या पाठीमागील वैज्ञानिक आशयाची आणि संकल्पनांची ज्ञानात्मक दृष्टिकोनाची प्रत्यक्ष अनुभूती घेतली.शैक्षणिक सहलींमुळे वर्गातील दैनंदिन वातावरणापासून दूर गेल्याने विद्यार्थ्यांनी तणावमुक्त होत सहलीच्या अनौपचारिक वातावरणाचा अनुभव घेतला.

सदरील सहल यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव , उपाध्यक्ष रवि जाधव यांनी योग्य मार्गदर्शन करुन,सर्वतोपरी सहकार्य केले आणि विद्यार्थ्यांना गगनभरारीचा आनंद मिळवून दिला. सहल नियोजना साठी प्राचार्य साहेबराव देवरे,पर्यवेक्षक विकास पाटील, सहशिक्षिका, सौ.ए.जी.देगावकर,सहशिक्षक,एस.डी.शिंदे,प्रयोगशाळा सहाय्यक एस.एन. देवकर यांनी परिश्रम घेऊन शैक्षणिक सहल यशस्वीरित्या पार पाडली.
