नांदेड| विमानतळ पोलीस ठाणे हद्दीत खंजर दाखवुन जबरी चोरी करून भीती निर्माण करणाऱ्या गुन्हयातील अज्ञात आरोपीकडून गुन्हा निष्पन्न करुन, गुन्हयातील मोबाईलसह स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या या कार्यवाहीमुळे जबरीने लूटमार करणाऱ्याची आता खैर नाही हे यावरून सिद्ध होऊ लागले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लॅश आऊट अंतर्गत जबरी चोरीच्या गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेवुन त्यांचे विरुध्द कार्यवाही करण्याबाबत पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांना आदेश दिले होते. त्यावरुन त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड येथील साईनाथ पुयड, पोलीस उप निरीक्षक यांचे पथक तयार करुन, त्यांना चोरीचे गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेणे बाबत आदेशित केले होते. त्या पथकाने दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी पथकातील पोलीस उप निरीक्षकसाईनाथ पुयड हे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेसह नांदेड शहरात पेट्रोलींग करीत होते.

यावेळी मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन गाडेगाव परीसरातून शेख सोहेफ शेख रहिम वय 19 वर्ष व्यवसाय मिस्त्रीकाम रा. मिल्लतनगर, नांदेड यास ताब्यात घेवून, त्याचेकडून एक विवो (Vivo) कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. त्या मोबाईल बाबत आरोपीस विचारपुस करता त्याने सांगीतले की, काही दिवसापुर्वी त्याने व त्याचा एक साथीदार शेख अमजद रा. मजहर कॉलनी, नांदेड (पुर्ण नाव माहीत नाही) यांनी मिळून एका इसमाकडुन खंजर दाखवुन काढून घेतला होता. त्याबाबत नांदेड जिल्हयाचे अभिलेखावर दाखल असलेल्या गुन्हयांची पडताळणी केली असता दिनांक 03/12/2024 रोजी पो. स्टे विमानतळ येथे गुरनं 491/2024 कलम 309(6), 3(5) भा. न्या. संहिता 2023 प्रमाणे गुन्हा दाखल असुन, सदर आरोपीचे ताब्यातुन रु. 10,000/- किमतीचा जप्त केलेला मोबाईल नमुद गुन्हयातील असल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्यावरुन सदर इसमास ताब्यात घेवून, पुढील तपास कामी पो स्टे. विमानतळ (Airport Police Station) येथे गुर.नं. 491/2024 कलम 309(6), 3(5) भा. न्या. संहिता 2023 मध्ये देण्यात आले आहे अशी उत्कृष्ट कामगीरी केली आहे. हि कार्यवाही अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड, श्री एस. व्हि. पुण्ड, पोलीस उप निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड, पोलीस अंमलदार किशन मुळे, बालाजी तेलंग, तिरुपती तेलंग, विलास कदम, संदिप घोगरे, संतोष बेल्लुरोड, बालाजी कदम, अमोल घेवारे, महिला पोलीस अंमलदार शितल सोळंके सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड, व सायबर सेल येथील राजेंद्र सिटीकर व दिपक ओढणे आदींनी केली आहे. त्याबद्दल पोलीस अधीक्षक यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
