लोहा| राष्ट्रमाता जिजाऊ जयंती त्यानिमिताने लोह्यात मोठ्या उत्साहात शहराच्या मुख्य रस्त्याने वाजत गाजत लेझीमच्या तालावर ..जय जिजाऊ ..जय शिवराय…असा घोषणांचा निनाद करत ..शोभायात्रा मोठ्या आनंदी वातावरणात पार पडली..

दरवर्षी प्रमाणे यंदाही रविवारी जिजामाता ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाच्या अंतर्गत चालणाऱ्या शाळांच्या वतीने शिवछत्रपती विद्यालयातून शहराच्या मुख्य रस्त्याने शोभा यात्रा निघाली. संस्थेचे कोषाध्यक्ष श्रीकांत पाटील पवार, राज्य पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त मुख्याध्यापक कृ भा जाधव , माजी उपनगराध्यक्ष रामराव सूर्यवंशी, व्ही जी चव्हाण, प्रा डॉ डी एम पवार, व्हाईस चेअरमन हरिभाऊ चव्हाण,सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक बी डी जाधव संस्थेच्या संचालिका वंदनाताई पवार, मारुती पाटील बोरगावकर ,अप्पाराव पवार, ज्ञानोबा पवार, दशरथ पवार, संकल्पक शाळेचे मुख्याध्यापक दामोदर वडजे ,प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हणमंत पवार, मुख्याध्यापक सुलतान खान , सुधाकर पाटील, अविनाश पवार, यासह शहरातील मान्यवर उपस्थित
श्रीकांत पाटील व मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्या नंतर शहराच्या मुख्य रस्त्याने राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या तैलचित्रासह भव्य शोभायात्रा निघाली.

जिजामाता शिक्षण संस्थेच्या अंतर्गत चालणाऱ्या शिवछत्रपती प्राथमिक व माध्यमिक विद्यालय लोहा डॉ याकूनखान उर्दू प्राथमिक शाळेच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्ताने शहरातून शोभा यात्रा काढली जाते. संस्थेचे अध्यक्ष वसंतराव पवार, कोषाध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्री ते जिजाऊ जयंती महोत्सव माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक दामोधर वडजे , प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एच जी पवार उर्दूचे मुख्याध्यापक सुल्तानखान याच्या पुढाकाराने गेल्या नऊ वर्षा पासून साजरा केला जातो. १२ रोजी जिजाऊ जयंतीनिमित्त शोभा यात्रा काढण्यात आली मिरवणुकीत राष्ट्रमाता जिजाऊ यांचे तैलचित्र , लेझीम , ढोल यांचा समावेश होता.
