हिमायतनगर| महाराष्ट्र राज्यात ४ जानेवारी ते १९ जानेवारी २०२५ या पंधरवड्यात राज्यभर जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतिने रक्तदान महायज्ञ शिबिराचे आयोजन करण्यात येते. शहरातील परमेश्वर मंदिर प्रांगणात दि.15 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता रक्तदान शिबिराचे आयोजित केले या रक्तदान शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या दिव्य प्रेरनेणे या महारक्तदान महायज्ञाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. माऊली दरवर्षीचं त्यांच्या भक्ताला संदेश भक्तांकडून साजरे करून घेत असतात आणि या उपक्रमात १००००० एक लाख रक्त बाटल्याचे उदिष्ट माऊलीने दिले आहे आणि या पैकी ५०००० बाटल्या ह्या देश्याच्या सीमेवरील सैनिकाला आणि ५०००० हजार बाटल्या महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, गोवा व गुजरात देऊन त्यांचे सामाजिक उपक्रम सरकार देऊन त्यांच्या मार्फत गोरगरीब गरजू पेशंटला हे रक्त पुरवले जाते.

असे अनेक उपक्रम माऊली राबवत असतात. त्यापैकी चा हा अतिशय महत्वाचा उपक्रम म्हणजे रक्तदान असून त्या अनुषंगाने हिमायतनगर शहरातील परमेश्वर मंदिर प्रांगणात दि.15 जानेवारी रोजी बुधवारी सकाळी ९:०० ते ६:३० वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. या रक्तदान महायज्ञ शिबिरासाठी हिमायतनगर तालुकाध्यक्ष शिवाजी एटलेवाड, महिला तालुकाध्यक्ष सुरेखाताई राठोड,सचिव सुर्यकांत माने, किसन कांदलेवाड, दत्ता शिरफूले, आनंद रासमवाड,माधव पवार,राजीव सुरजवाड , लक्ष्मण करेवाड, गणेश मुठेवाड, संतोष गुंफलवाड,स्व स्वरूप संप्रदाय तालुका कमिटी हिमायतनगर यांच्या वतीने आयोजित केले आहे.
