हिमायतनगर,अनिल मादसवार| तालुक्यातील गोर गरीब व सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी हिमायतनगर येथील पंचायत समिती कार्यालयातील स्व. वसंतराव चव्हाण सभागृहात आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी सोमवारी जनता दरबार भरविला जाणार आहे.

हिमायतनगर येथील तालुका दंडाधिकारी, गटविकास अधिकारी व तसेच सर्व खात्याचे खातेप्रमुख अधिकारी, कर्मचारी यांच्या कामकाजात सुधारणा आणून सर्व सामान्य जनतेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी दि. १३ सोमवारी सकाळी ११ वाजता पंचायत समिती कार्यालयातील स्व. वसंतराव चव्हाण सभागृहात (जनता दरबार)आमसभेच आयोजन करण्यात आले आहे. या सभेला हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.

आत्तापर्यंत कोणत्याही आमदारांनी जनता दरबार घेऊन जनतेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले नाही. त्यामुळे नूतन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी हिमायतनगरला पहिली आमसभा (जनता दरबार) लावली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या समस्यां सोडविण्यासाठी ते कश्या प्रकारची भूमिका घेतात याकडे शहर व तालुक्यातील ग्रामीण जणतेसह सर्वाचेच लक्ष लागून आहे.

मागील अनेक वर्षांपासून हिमायतनगर तालुक्यातील कर्तव्यावर असलेले जवळपास सर्वच अधिकारी, कर्मचारी हे सातत्याने गैरहजर राहुन कर्तव्यात कसूर करूण सर्वमान्य जनतेच्या समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष करतात. तसेच ग्रामसेवक तर पंधरा, पंधरा दिवस ग्रामपंचायतीकडे फिरकतच नाहीत. परिणामी अनेक महत्त्वपूर्ण विकासाची कामे अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. एव्हढेच नाहीतर तालुक्यात महावितरण, बांधकाम, पोलीस, पंचायत समिती, तहसील कार्यालयात मनमानी कारभार बोकाळला असून, सर्व प्रकारचे अवैध्य धंदे वाढल्याने, तालुक्यात बोगस कामाचा बोलबाला झाला आहे. विकासाची घडी संपूर्णतः विस्कटलेली असताना आमदार महोदयांची दिनांक १३ रोजी होणारी पहिलीच आम सभा आहे.

आमदार कोहळीकर यांनी हदगावच्या आमसभेत कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांचा चांगलाच परेड घेतला होता. जनतेची कामे वेळेवर झाली पाहिजेत. नाहीतर योग्य वेळी, योग्य पद्धतीने कारवाई करण्यात येईल. कामचुकार पणा खपवून घेतला जाणार नाही. अशी तंबी दिली होती आता हिमायतनगर येथील कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी आमदार काय? भुमिका घेतात. हे पाहणे आता उत्सौक्त्याचे ठरणार आहे.