किनवट, परमेश्वर पेशवे| रेल्वे धावपट्टीच्या किनवट येथिल रखडत ठेवलेल्या भुयारीपूल आणि गोकुंदा येथिल उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात न केल्याने प्रवाशांची फटफजीत होतांना दिसते. उपजिल्हा रुग्णालयातील पुढील उपचारासाठी आदिलाबादकडे पाठवण्यात आलेल्या गरजू रुग्णांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका रेल्वेच्या वेळेत गेटबंद केल्यानंतर अर्धा-अर्धा तास ताटकळत बसत असल्याने रुग्णांच्याही आरोग्याचा प्रश्न भेडसावतोय. गुत्तेदार, किनवट नगर परिषद, रेल्वे विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने युद्धपातळीवर कामाला गती देण्याची मागणी होत आहे.

किनवटपासून मांडवामार्गे झेंडीगुडा जाणार्या मार्गावरील रेल्वे गेटवर भुयारीपुलाच्या कामाला सुरुवात झाली होती. खोदकामादरम्यान शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी ही काम थांबायला कारण ठरली. किनवट नगर परिषदेने रेल्वे धावपट्टीच्या खालून गेलेली जलवाहिनी हटवल्याशिवाय भुयारीपुलाच्या कामाला वेग येणार नाही. रेल्वेविभागाने तत्परता दाखवली परंतू जलवाहिनीचा मध्येच फाल्गूनमास म्हणल्यागत आडवा आल्याने कामबंद झाले आहे. कामबंदमुळे तिथून वाहतूक करणारे वाहाने आणि लोकांना त्रास होतांना दिसतो. खोदून ठेवलेल्या खड्यामध्ये पडून लोकांना बाधा पोहोचण्याची शक्यता व्यक्तविली जात आहे. किनवट न.प.चे मुख्याधिकारी डाॅ.अजय कुरवाडे यांनी विशेष लक्ष देऊन विकास कामाला अडथळा ठरलेल्या जलवाहिनीला अन्यत्र हलवल्याशिवाय भुयारीपुलाच्या कामाला गती मिळणार नसल्याच्या प्रतिक्रीया समोर येताहेत.

गोकुंदा येथिल रेल्वे उड्डानपुलाचीही अवस्था अशीच कांहीशी आहे. अनेकवेळा स्थळचाचण्या झाल्या. ग्रीन सिग्नलही मिळाले. टेंडर प्रक्रीया पार पडली परंतू कामाच्या नावे शुन्यच. राष्ट्रीय महामार्ग प्रशासन या कामासाठी का उदाशीन आहे ? याबद्दलची अद्याप वाच्चता होऊ शकली नाही. मुद्दत संपल्यास मुद्दतवाढ मिळाली कि विहित कामाच्या रक्कमेत वाढ करुन शासन तिजोरीवर भूर्दंड घातला जातो. वरिष्ठ प्रशासनाने अशा अदाशीन एजंसीजवर वेळीच कारवाई करायला हवी अशा लोकप्रतिक्रीया झपाट्याने पुढे येत आहेत. त्याला कारणही तसेच आहे. उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आलेले रुग्ण गंभीर अवस्थेत असतील तर त्यांना येथे प्राथमिक उपचार करुन तेलंगणा राज्याच्या आदिलाबाद येथिल शासकीय रुग्णालयाकडे पुढील उपचारासाठी पाठवले जाते.

रेल्वेच्च्या वेळेत गेटबंद केले जातात. अशातच वाहानांची चिक्कार गर्दी होते. बेशिस्तपणे वाहाने उभी केलेली असतात. अर्धा अर्धा तास वाहानांच्या रांगा संपत नाहीत. अशात अनेकवेळा रुग्णवाहिका वाहानांच्या गर्दीत अडकल्या जाते. गंभीर रुग्णाची अशा वेळी काय अवस्था होत असेल ? याची सर्वांनीच कल्पना केलेली बरी. म्हणून महामार्ग प्राधिकरणाने गोकुंद्यातील उड्डानपुलाच्या कामाला गती देण्षाची नितांत गरज असल्याचे प्रवाशांचे म्हणने आहे.
