नांदेड| पोलीस स्टेशन तामसा येथील पोलीसांनी मोटार सायकल चोरास चोरीच्या सात मोटार सायकलसह ताब्यात घेतले असून, मोटार सायकल अंदाजे किंमती 3,00,000/-रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तामसा पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कार्यवाहीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार नांदेड यांनी ऑपरेशन फ्लॅश आऊट अंतर्गत मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे सर्व पोस्टे. प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने तामसा ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे. तामसा येथील अधिकारी व अंमलदार यांनी मोटार सायकल चोरीच्या गुन्हयातील फरार आरोपी नविन नारायण गुदेवार वय 32 वर्षे रा. दिवशी बु. ता. भोकर जि. नांदेड याचा दि.08 जानेवारी 2025 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून शोध घेतला.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपुस केली असता 05 हिरो कंपनिच्या HF DELUXE प्रत्येकी किंमत 40,000/-रु, PASSION PRO HERO कंपनीचे 02 बिना नंबरप्लेट असलेल्या जुन्या मो.सा. प्रत्येकी किंमत 50,000/-रु.असे एकुण 07 चोरीचे मो.सा. आढळून आल्याने मोटार सायकल किंमती 3,00,000/-रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ. नागरगोजे हे करीत आहेत.
हि कार्यवाही अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड, खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधिक्षक, भोकरमी सुरज गुरव, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, शफाकत आमना, सहायक पोलीस अधिक्षक, उपविभाग भोकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हा उघडकीस आणणारे पोलीस अधिकारी व अंमलदार कमल व्ही. शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक, बालाजी के. नरवटे , पोउपनी, पोहेकॉ. श्यामसुंदर अशोकराव नागरगोजे, पोकॉ, प्रकाश कबले, पोकॉ. डोरले, मपोकॉ. साखरवाडे, सर्व नेमणुक पोलीस स्टेशन तामसा यांनी केली आहे.