नांदेड| नांदेड ग्रामीण पोलीसांची एकाच वेळी दोन जुगार अड्यावर छापा टाकून नऊ जणांवर धडक कार्यवाही केली असून, आरोपींवर कलम 112 भारतीय न्याय संहीता-2023 सह कलम 12 (A) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 43/2025 कलम 112 भारतीय न्याय संहीता -2023 सह कलम 4, 5 महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 अंतर्गत कार्यवाही करून जुगाराचे साहीत्य, पत्ते व नगदी असे एकुण 1,72,900 रुपयाचा माल जप्त केला आहे. या कार्यवाहीमुळे जुगार अड्डे चालकाच्या एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सवसितर वृत्त असे कि, नांदेडचे पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत अवैध धंदयाची माहीती काढुन कार्यवाही करण्याचे आदेश सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांना दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण, येथील पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथील गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी वेळ सायंकाळी 5 वाजता गाडेगाव रोड पाण्याच्या टाकीजवळ मलव्यात/गटार शेजारी नांदेड येथे आरोपी शेख गफार ऊर्फ लगडा हा क्लब चालवित असल्याची खात्रीशीर माहीती घेवुन तो चालवत असलेल्या जुगार अड्यावर छापा टाकण्यात आला.
तसेच कल्ब चालविणारा मंहमंद गौस शेख महेताब हा त्यांचे राहते घरात पहील्या माळयावर महेबुबीयों कॉलनी मलंगबाब बिल्डींग शेजारी खुदबेईनगर नांदेड सदर ठिकाणी छापा मारुन 09 आरोपीवर कार्यवाही केली आहे. यात जुगार चालविणारे व खेळणारे यांचे कडुन जुगाराचे साहीत्य, पत्ते, नगदी रुपये असा एकुण 1 लाख 72 हजार नऊशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर आरोपीवर पो.स्टे. नांदेड ग्रामीण येथे गु.र.नं. 42/2025 कलम 112 भारतीय न्याय संहीता -2023 सह कलम 12 (A) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 आणि पो.स्टे. नांदेड ग्रामीण गु.र.नं. 43/2025 कलम 112 भारतीय न्याय संहीता 2023 सह कलम 4, 5 महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तसेच जुगार चालक व खेळणारे मोहमंद सलीम पि. मोहमंद खाजा रा. मिल्लतनगर गाडेगाव रोड, मोहमंद मोसीन मोहमंद हानीफ रा. उमरकॉलनी देगलूरनाका नांदेड, शेख मुक्तार उर्फ बाबा शेख सत्तार (फरार), शेख गफार ऊर्फ लगडा (फरार), शेख सोहेल शेख अजगर रा. महेबुबीया कॉलनी खुदबेईनगर नांदेड, शेख इमरान शेख महेमुद रा. हाबिबीया कॉलनी, खुदबेईनगर नांदेड, सय्यद अलीम सय्यद शादुल रा. महेबुबीया कॉलनी नांदेड, शिवा प्रकाश कांबळे रा. धनेगाव नांदेड याना ताब्यात घेण्यात आले असून, महमंद गौस शेख महेताब रा. महेबुबीयों कॉलनी देगलुर नाका नांदेड हा (फरार) झाला आहे. यांचेवर B.N.S. प्रमाणे संघटीत गुन्हेगाराची कलम 112 लावण्यात आले आहे.
हि कार्यवाही अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड, खंडेराव धरणे अपर पोलीस अधिक्षक, भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, सुशील कुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग, इतवारा, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हा उघडकीस आनणारे पोलीस अधिकारी ओमकांत चिंचोलकर, पोलीस निरीक्षक पो.स्टे. नांदेड ग्रामीण, महेश कोरे, पोलीस उपनिरीक्षक, पो.स्टे. नांदेड ग्रामीण, पोलीस अमंलदार पोहेकों. वाकडे, पोना.डफडे, पोकों. पवार, पोको. कल्याणकर, पोका. जमीर सर्व नेमणुक पो.स्टे. नांदेड ग्रामीण यांनी केली असून, सदर दोन्ही गुन्हयाचा तपास पोहेकों, केंद्रे ने. पो.स्टे. नांदेड ग्रामीण हे करीत आहेत. सदरची कामगीरी करणाऱ्या पथकाचे वरिष्ठांनी कौतुक केले आहे.