flyover works at Gokunda : महामार्ग प्राधिकरणाने गोकुंदा येथील उड्डाण पुलांच्या कामांना गती देण्याची मागणी -NNL
किनवट, परमेश्वर पेशवे| रेल्वे धावपट्टीच्या किनवट येथिल रखडत ठेवलेल्या भुयारीपूल आणि गोकुंदा येथिल उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात न केल्याने प्रवाशांची फटफजीत होतांना दिसते. उपजिल्हा रुग्णालयातील पुढील उपचारासाठी आदिलाबादकडे पाठवण्यात आलेल्या गरजू रुग्णांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका रेल्वेच्या वेळेत गेटबंद केल्यानंतर अर्धा-अर्धा तास ताटकळत बसत असल्याने रुग्णांच्याही आरोग्याचा प्रश्न भेडसावतोय. गुत्तेदार, किनवट नगर परिषद, रेल्वे विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने युद्धपातळीवर कामाला गती देण्याची मागणी होत आहे.
किनवटपासून मांडवामार्गे झेंडीगुडा जाणार्या मार्गावरील रेल्वे गेटवर भुयारीपुलाच्या कामाला सुरुवात झाली होती. खोदकामादरम्यान शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी ही काम थांबायला कारण ठरली. किनवट नगर परिषदेने रेल्वे धावपट्टीच्या खालून गेलेली जलवाहिनी हटवल्याशिवाय भुयारीपुलाच्या कामाला...
