नांदेड| जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात येणाऱ्या मौजे बरबडा येथे कोंबडीच्या अंड्यावरून वाद झाला असून, एकास लोखंडी खूसा व विळ्याने मारहाण करित खून करण्याचा प्रयत्न (The dispute over chicken eggs turned deadly) झाला आहे. या प्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा येथे दिनांक 27 जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास फिर्यादी प्रकाश सायन्ना अन्नमवाड हे शेतातून घराकडे येत असताना बाबु बकेवाड, नरेश बाबु बकेवाड, साई बाबु बुकेवाड या तिघांनी संगणमत करून शेतातून कोबंडीचे अंडे का घेऊन गेलास या कारणावरून वाद घातला. आणि शिवीगाळ करून लाथाबुक्यानी मारहाण केली तसेच हातातील लोखंडी खुष्याने पायावर मारून जखमी केले. जिवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी विळ्याने गळ्यावर वार करीत असताना तो चुकविण्यासाठी प्रकाश आनेमवाड यांनी डावा हात समोर केला असता हातास गंभीर दुखापत करून खुन करण्याचा प्रयत्न केला.

अशी फिर्याद प्रकाश सायना आनेमवाड, वय 50 वर्षे, व्यवसाय शेती रा. बरबडा यांनी दिल्यावरुन कुंटुर पोलीस ठाण्यात तीन आरोपीविरुद्ध गुरनं 18 / 2025 कलम 109, 115 (2), 3, 5 बीएनएस – 2023 कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोउपनि श्री सोनुळे हे करीत आहेत.
