नांदेड। हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, मराठी विभाग, इंग्रजी विभाग, हिंदी विभाग आणि ग्रंथालय यांच्यातर्फे दिनांक 01 जानेवारी ते 15 जानेवारी 2025 दरम्यान वाचन संकल्प महाराष्ट्राचा या पंधरवडा कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत . त्यानिमित्ताने आज दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी महाविद्यालयामध्ये या तिन्ही विभागाद्वारे पुस्तक परीक्षण व लेखन स्पर्धा घेण्यात आली .
या स्पर्धेमध्ये सुरुवातीला महाविद्यालयातील प्राचार्या डॉ .उज्वला सदावर्ते यांच्या हस्ते जयवंतराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्यानंतर मंचावरील मान्यवरांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व रूपरेषा ग्रंथपाल बोंबले राजू यांनी सांगितली तसेच अध्यक्षीय मनोगत महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.उज्वला सदावर्ते मॅडम यांनी केले.
त्यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथ वाचनाचे फायदे सांगून प्रत्येकाने पुस्तक वाचली पाहिजे वाचन संस्कृती जपली पाहिजे असा सल्ला दिला व विविध कादंबरी पुस्तकाविषयी नालंदा विद्यापीठातील ग्रंथालय विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, भाषा विभाग प्रमुख मराठी, हिन्दी, इंग्रजी व ग्रंथालय विभाग ग्रंथपाल व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित होते .
वाचन संकल्प महाराष्ट्राचा आजच्या स्पर्धेमध्ये पुस्तक परीक्षण व लेखन स्पर्धा यासाठी 59 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व दहा प्राध्यापक या स्पर्धेमध्ये उपस्थित होते खरोखरच वाचन संस्कृती आपण प्रत्येकाने जोपासली पाहिजे. यामधून दिसून आले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ.एल एस पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.आशिष दिवडे यांनी केले .