बिलोली, गोविंद मुंडकर। नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील मिनकी येथील पिता पुत्राने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. ९ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
मिनकी येथील शेतकरी राजेंद्र लक्ष्मण पैलवार यांचा बाहेर गावी शिक्षणास असलेला मुलगा ओंकार राजेश पैलवार संक्रांत सना निमित्त गावाकडे आला होता. ओंकार याने नवीन कपडे व मोबाईल घेण्यासाठी वडिलांकडे पैसे मागत होता. मात्र सततची नापीकी, बॅकेचे कर्ज आणि वाढते शैक्षणिक खर्च यामुळे कपडे व मोबाईल घेण्यासाठी थांब असे सांगितले होते. मात्र नैराश्येत मुलाने दि. ८ रोजी रात्री शेतातील झाडाला गळफास घेतली.
दुसऱ्या दिवशी मुलगा घरी परतला नसल्याने राजेंद्र पैलवार हे मुलाचा शोध घेत असताना ओंकार याचा म्रतदेह झाडाला लटकल्याचे दिसून येताच. मुलाने गळफास घेतलेल्या दोरीने पित्याने ही गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची माहिती पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी दिली आहे.