Wednesday, July 8

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Gurmeetsingh Tamana ; गुरुद्वारा बोर्ड कर्मचाऱ्यांना नियमानुसार पदोन्नति मिळावी : गुरमीतसिंघ टमाना

Gurmeetsingh Tamana ; गुरुद्वारा बोर्ड कर्मचाऱ्यांना नियमानुसार पदोन्नति मिळावी : गुरमीतसिंघ टमाना

नांदेड, करियर
नांदेड l येथील सर्वोच्च धार्मिक संस्था गुरुद्वारा तखत सचखंड बोर्ड मध्ये कार्यरत वरिष्ठ कर्मचाऱ्यांना नियमानुसार पदोन्नति देण्यात यावी. दोन वर्षें डेली वेजेस सेवा पूर्ण करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना स्थाई सेवेत समाविष्ट करुन घ्यावे आणी रोजन्दार तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांना डेली वेजेस सेवेत सहभागी करुन घेण्यात यावे. अशी मागणी शिवसेना पक्षाचे दक्षिण विभागातील सहसंपर्क प्रमुख सरदार गुरमीतसिंघ टमाना यांनी एका पत्राद्वारे गुरुद्वाराचे प्रशासक डॉ विजय सतबीरसिंघ यांच्याकडे केली आहे. पात्रात नमूद करण्यात आले आहे की गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने कर्मचाऱ्यांना पदोन्नति देण्यात बाबत एका त्रिसदस्यीय समितीचे गठन करण्यात आले आहे. पण पदोन्नति देण्यातकरिता नियमांचे पालन आवश्यक आहे. महाराष्ट्र सर्विस रूल्सचे आधार घेवून आणी वेतन श्रेणीच्या सिफाराशिचा अभ्यास करुनच निर्णय घेण्यात यावेत. मागील काळात ज्या व...
Triratnakumar Bhavare : त्रिरत्नकुमार भवरे कलाभूषण पूरस्काराने सन्मानित

Triratnakumar Bhavare : त्रिरत्नकुमार भवरे कलाभूषण पूरस्काराने सन्मानित

करियर, नांदेड
नांदेड| बहुजन टायगर युवा फोर्सचे संस्थापक अध्यक्ष आणि लोकपारंपारिक कलावंताच्या न्याय व हक्कासाठी सदैव कर्तव्यतत्पर व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित असलेले त्रिरत्नकुमार भवरे यांना कलाभूषण पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. पिएफसी संस्था मुखेड व शाहीर महर्षी आत्माराम पाटील शाहीर मंचच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती आणि शाहीर आत्माराम पाटील जन्मशताब्दी वर्षांनिमित्त सुजलेगांव ता.नायगांव (खै.) येथे आज दि.२४ फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यक्रमात सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील उत्तुंग योगदानासाठी त्रिरत्नकुमार मारोतीराव भवरे कामारीकर यांना कलाभूषण पुरस्कार देऊन नांदेडचे लोकप्रिय खा.रविंद्र वसंतराव चव्हाण यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी जेष्ठ नेते माधवराव पाटील शेळगांवकर,जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवराज पाटील होटाळकर, युवानेते राजेश गं...
employment is half full : अर्धापूरात भरला रोजगाराचा महाकुंभ; साडेसहा हजार तरूणांचा सहभाग

employment is half full : अर्धापूरात भरला रोजगाराचा महाकुंभ; साडेसहा हजार तरूणांचा सहभाग

करियर, नांदेड
नांदेड| पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडूण आल्यानंतर चांगले काहीतरी करून दाखविण्याच्या भावनेने प्रेरीत झालेल्या आ.श्रीजया चव्हाण यांच्या पुढाकारातून साकारलेल्या रोजगार मेळाव्यात रोजगाराचा जणू आज महाकुंभच भरला होता. नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील साडेसहा हजार बेरोजगार युवक-युवतींनी या महाकुंभात आपला सहभाग नोंदविला. त्यातील तब्बल दीड हजार जणांची विविध पदांसाठी निवड करण्यात आली. रोजगार मेळावा हा नांदेड जिल्ह्यासाठी ऐतिहासिक ठरला आहे. अर्धापूर येथे दि.22 रोजी रोजगार मेळाव्याचे आ.श्रीजया चव्हाण यांनी आयोजन केले होते. या मेळाव्यासाठी आ.श्रीजया चव्हाण व त्यांची टीम मागील दोन महिन्यांपासून अहोरात्र मेहनत घेत होती. त्याचीच फलश्रुती म्हणून हा भव्यदिव्य रोजगार मेळावा संपन्न झाला. पुणे, मुंबईला लाजवेल अशी कार्पेरेट व्यवस्था पाहून विविध कंपन्यांचे अधिकारी यांच्यासह प्रमुख पाहुणेसुध्दा या व्यवस्थेवर प्...
On behalf of Zilla Parishad Nanded : जिल्हा परिषद नांदेडच्या वतीने शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा बंगळूर अभ्यासदौरा यशस्वीरीत्या संपन्न

On behalf of Zilla Parishad Nanded : जिल्हा परिषद नांदेडच्या वतीने शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा बंगळूर अभ्यासदौरा यशस्वीरीत्या संपन्न

करियर, नांदेड
नांदेड| जिल्हा परिषद नांदेडच्या वतीने शासनाच्या ‘अविष्कार’ योजनेअंतर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी 17 ते 21 फेब्रुवारी 2025 या कालावधीत बंगळूर येथे अभ्यासदौरा आयोजित करण्यात आला. या शैक्षणिक सहलीत 38 मुली आणि 30 मुले असे एकूण 68 विद्यार्थी सहभागी झाले होते. जिल्हा परिषदेच्या कार्यतत्पर मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या प्रेरणेतून व प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यासदौरा यशस्वीरित्या पार पडला. विद्यार्थ्यांनी या सहलीदरम्यान विश्वेश्वरय्या औद्योगिक व प्राद्योगिक संग्रहालय येथे सायंटिफिक मॉडेल्सचा अभ्यास केला तसेच HAL एरोनॉटिक्स आणि स्पेस म्युझियम मध्ये विविध वैमानिक तंत्रज्ञानाची माहिती घेतली. जवाहरलाल नेहरू प्लॅनेटेरियम येथे सूर्यमाला, चंद्रयान मोहिमा आणि गुरुत्वाकर्षण शक्तीविषयी सखोल माहिती घेतली. लालबा...
Farooq Ahmed : सदाबहार फाऊंडेशनचा कार्यकर्ता गौरव पुरस्कार फारुक अहमद यांना जाहीर

Farooq Ahmed : सदाबहार फाऊंडेशनचा कार्यकर्ता गौरव पुरस्कार फारुक अहमद यांना जाहीर

करियर, नांदेड
नांदेड| सामाजिक व राजकीय क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत असणारे वंचित बहुजन आघाडीचे राज्यप्रवक्ते फारुख अहमद यांना सदाबहार फाऊंडेशनच्या वतीने यंदाचा कार्यकर्ता गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सदाबहार फाउंडेशन ही मराठवाड्यातील जेष्ठ समाजवादी नेते दिवंगत सदाशिवराव पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सेवाभावी कार्य करणारी एक स्वयंसेवी संस्था असून मागील चार वर्षापासून सदाबहार फाउंडेशनच्या वतीने सामाजिक व शैक्षणिक त्याचबरोबर राजकीय क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने आणि सचोटीने कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांचा गौरव केला जातो. यावर्षीचा या फाउंडेशनचा कार्यकर्ता गौरव पुरस्कार वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारूक अहमद यांना जाहीर करण्यात आला असल्याचे पत्र सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.लक्ष्मण शिंदे, प्रा. आर. ए. मुनेश्वर, प्रा. एस आर. दुल्लेवाड यांनी फारुख अहमद यांना दिले आहे. अनेक वर्षा...
Devangkumar Kakade : देवांगकुमार काकडे गोल्ड मेडल पुरस्काराने व सन्मानपत्रनी सन्मानित

Devangkumar Kakade : देवांगकुमार काकडे गोल्ड मेडल पुरस्काराने व सन्मानपत्रनी सन्मानित

नांदेड, करियर
नांदेड| नुकतीच झालेल्या राष्ट्रीय ऑलिम्पियाड स्कॉलरिया मॅथ्स ऑलिम्पियाड 2025 च्या परीक्षेचा निकाल लागलेला असून, ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल-नांदेड येथील ईयता चौथी वर्गात शिकत असलेल्या देवांगकुमार दिलीपराव काकडे यांनी या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवल्याबद्दल त्याला गोल्ड मेडल (GOLD MEDAL) सुवर्णपदक व सन्मानपत्रानी गौरविण्यात आल आहे. *अतिष्य बालवयात मिळविलेल्या दैदित्यमान या यश प्राप्ती बद्दल देवांगकुमार चे नांदेड येथील नागलवाड कोचिंग क्लासेस चे संचालक श्री नागलवाड सर व सर्व शिक्षक वृंद व वर्ग मित्र मंडळ यांनी देवांगकुमार ला पुष्पगुच्छ देऊन अभिनंदनाचा वर्षाव करून पुढील शैक्षणिक कार्यास हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे मोठ्या प्रमाणात अनेक थोर मोठ्याकडूण त्याचे कौतुक देखील करण्यात येत आहे....
Technical Festival ; श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेत राष्ट्रीय स्तरावर तांत्रिक महोत्सवाचे आयोजन

Technical Festival ; श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेत राष्ट्रीय स्तरावर तांत्रिक महोत्सवाचे आयोजन

नांदेड, करियर
नवीन नांदेड l तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण संधी मिळाव्यात, त्यांचे कौशल्य समृद्ध होऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा यासाठी श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था, नांदेड येथे राष्ट्रीय स्तरावर प्रज्ञा २०२५ या तांत्रिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे हा महोत्सव दिनांक २१,२२, व २३ फेब्रुवारी २५ रोजी संस्थेत आयोजित केला जात आहे. “प्रज्ञा २०२५“ या महोत्सवात विद्यार्थ्यांना आणि तंत्रज्ञानप्रेमींना एक चांगले व्यासपीठ मिळणार आहे, जिथे ते त्यांच्या कौशल्य व तांत्रिक क्षमता प्रदर्शित करू शकतात. प्रमुख आकर्षण म्हणून, यंदा विविध स्पर्धा, कनिष्ठ शास्त्रज्ञ Junior Scientist ,भव्य पुस्तक प्रदर्शन, कार्यशाळा, सेमिनार्स, प्रकल्प स्पर्धा, कोडिंग चॅलेंजेस, तंत्रज्ञानविषयक चर्चासत्रे, रोबोट्सविषयक विविध कठीण स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. ...
Indira Gandhi College ; डॉ.दुर्गेश रवंदे इंदिरा गांधी महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी रूजू

Indira Gandhi College ; डॉ.दुर्गेश रवंदे इंदिरा गांधी महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी रूजू

नांदेड, करियर
नवीन नांदेड l श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचालित इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालय सिडको नांदेड येथे साहित्यिक व इंग्रजीचे गाढे अभ्यासक डॉ.दुर्गेश रवंदे प्राचार्यपदी रूजू झाले आहेत. प्राचार्य डॉ. रवंदे यांच्या नियुक्ती बदल‌ आयोजित सत्कार सोहळ्यात म्हणाले की,विद्यार्थ्यांचं हित महत्त्वाचे आहे,विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. विद्यार्थी आहोत म्हणून आपण आहोत,आपल्या पुढील आव्हाने खूप आहेत पण विद्यार्थ्यांपुढे आपण काय घेऊन जातो आणि त्यांना काय देतो हे फार महत्त्वाचे आहे.अध्यापनामुळे महाविद्यालयात नवचैतन्य निर्माण होते, त्यामुळे आपल्यालाही जीवन आनंददायी अनुभव येईल. अध्यापकांनी अध्यापन सोबतच संशोधन प्रकल्प मिळवण्यासाठी प्रयत्न केले. पाहिजे.संशोधन प्रकल्प आपल्या महाविद्यालयाचे व संस्थेचे नाव उज्ज्वल करते. एखादी गोष्ट जर करणं भागच असेल तर त्यात रस घेऊन केला तर ते काम अधिक सुंदर होईल...
exam centers ; ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत 14 परिक्षा केंद्रावर दहावी परिक्षांना‌ सुरूवात

exam centers ; ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत 14 परिक्षा केंद्रावर दहावी परिक्षांना‌ सुरूवात

नांदेड, करियर
नवीन नांदेड l महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ लातूर विभागाच्या वतीने दहावी शालांत परिक्षांना ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत 14 केद्रांवर 21 फेब्रुवारी पासून सुरूवात झाली आहे,परिक्षा केंद्रावर ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता. ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील शिवाजी हायस्कूल सिडको,जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय विष्णुपुरी, कुसुमताई माध्यमिक विद्यालय सिडको ,इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय सिडको, महात्मा गांधी महाविद्यालय सिडको, शिवशक्ती माध्यमिक विद्यालय काकांडी. श्री.मधुबन महाराज विद्यालय धनेगाव, राष्ट्रमाता मराठी उर्दू माध्यमिक विद्यालय वाजेगाव, शिवाजीराव पाटील हायस्कूल वाजेगाव,शांती निकेतन पब्लिक स्कूल सिडको,महात्मा फुले पोस्ट बेसिक अश्राम शाळा‌ वाघाळा, माधवराव वटेमोड विघालय जुना कौठा,नरहर कुरुंदकर महाविद्यालय जुना कौठा, गोदावरी माध्...

Education and health of girls in danger : अनुसूचित जाती मुलींच्या शासकीय निवासी शाळेत मुलींचे शिक्षण व आरोग्य धोक्यात..?

नांदेड, करियर
श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे| येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे वतीने चालविण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती मुलींच्या शासकीय निवासी शाळेत भोजन, नास्ता, दूध, अंडी व ऋतुमानानुसार फळे पुरविण्याची जबाबदारी ब्रिक्स इंडिया लिमिटेड पुणे या खासगी कंपनीची आहे. परंतु या कंपनीचा कुणीही जबाबदार व्यक्ती इथे कार्यरत नसल्याने ती जबाबदारी मुख्याध्यापक यांचेवर येऊन पडली आहे. त्यामुळे शासनाच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला जात असल्याचा प्रत्यय येतो आहे. अनुसूचित जाती मुलीच्या या शासकीय निवासी शाळेत इयत्ता सहावी ते दहावी पर्यंत वर्ग आहेत. त्यात १८० विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. या निवासी शाळेत शिक्षक व शिक्षकेत्तर असे एकूण १९ पदे मान्य आहेत. त्यापैकी ६ शिक्षक व ३ शिक्षकेत्तर कर्मचारीच आज कार्यरत असून तब्बल १० पदे रिक्त आहेत. त्यात ३ माध्यमिक व ३ प्राथमिक या शिक्षकांचा समावेश असल्याने विद्यार्थिनींचे...
error: Content is protected !!