HomeनांदेडDYFI's : डीवायएफआयचे नांदेड तालुका अधिवेशन उत्साहात संपन्न

DYFI’s : डीवायएफआयचे नांदेड तालुका अधिवेशन उत्साहात संपन्न

नांदेड| डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) या राष्ट्रीय युवक संघटनेचे नांदेड तालुका अधिवेशन दि.१० ऑगस्ट रोजी संघर्ष भवन सीटू कार्यालय नांदेड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

शिक्षण,रोजगार,हाताला काम कामानुसार दाम मिळावा म्हणून देशातील युवकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावरची लढाई लढणारी ही देशव्यापी संघटना आहे.देशभरात या युवा संघटनेचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे, यावेळी शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या क्रांतिकारकांना अभिवादन करण्यात आले. या अधिवेशनात डी.वाय.एफ.आय. नांदेड जिल्ह्याचे सचिव कॉ.स्टॅलिन आडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी नांदेड शहर व तालुका समिती ची निवड करण्यात आली. डीवायएफआय. तालुका अध्यक्ष पदी कॉ. जयराज गायकवाड तर सचिव कॉ.शाम ए.सरोदे यांची एकमताने निवड करण्यात आली. सहसचिव कॉ.दिलिप कंधारे, उपाध्यक्ष कॉ.सुभाषचंद्र गजाभरे, यांची देखील निवड करण्यात आली. सदस्य म्हणून, कॉ.केशव सरोदे, कॉ. सुरज सरोदे, कॉ.विजय सरोदे, कॉ. गोपीप्रसाद गायकवाड, संगेश खंदारे यांची निवड करण्यात आली. या अधिवेशनाला प्रमुख पाहूणे म्हणून, जनवादी महिला संघटनेच्या उपाध्यक्षा कॉ.करवंदा गायकवाड यांची उपस्थिती होती. त्यांनी अधिवेशनास शुभेच्छा दिल्या. पुढील काळात युवकांचे प्रश्न घेऊन लढा तीव्र करण्याचा निर्धार नूतन कमिटीने केला असून नूतन कमिटीचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments