DYFI’s : डीवायएफआयचे नांदेड तालुका अधिवेशन उत्साहात संपन्न
नांदेड| डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) या राष्ट्रीय युवक संघटनेचे नांदेड तालुका अधिवेशन दि.१० ऑगस्ट रोजी संघर्ष भवन सीटू कार्यालय नांदेड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
शिक्षण,रोजगार,हाताला काम कामानुसार दाम मिळावा म्हणून देशातील युवकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावरची लढाई लढणारी ही देशव्यापी संघटना आहे.देशभरात या युवा संघटनेचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे, यावेळी शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या क्रांतिकारकांना अभिवादन करण्यात आले. या अधिवेशनात डी.वाय.एफ.आय. नांदेड जिल्ह्याचे सचिव कॉ.स्टॅलिन आडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी नांदेड शहर व तालुका समिती ची निवड करण्यात आली. डीवायएफआय. तालुका अध्यक्ष पदी कॉ. जयराज गायकवाड तर सचिव कॉ.शाम ए.सरोदे यांची एकमताने निवड करण्यात आली. सहसचिव कॉ.दिलिप कंधारे, उपाध्यक्ष कॉ.सुभाषचंद्र गजाभरे, यांची देखील निवड करण्यात आली. सदस्य म्...
