उस्माननगर| येथील सिध्दार्थ एज्युकेशन सोसायटी संचलित सम्राट अशोक प्राथमिक शाळेत (Samrat Ashok Primary School) भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनी शाळेचे संचालक देवरावजी सोनसळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

सकाळी भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून व संविधानाची पुजा करुन अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे शाळेचे मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांनी शब्द सुमनाने स्वागत केले.त्यानंतर शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी देशभक्ती व मराठमोळ्या गीतावर लेक्षीमच्या निनादात सुंदर असे सादरीकरण केले. उपस्थित मान्यवरांनी शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थीनीनीचे टाळ्या वाजवून कौतुक केले. आणि गावातील प्रमुख मार्गाने लेक्षीमच्या निनादात प्रभात फेरी काढण्यात आली. देशभक्ती व मराठी, मराठमोळ्या लावणी आणि साक्षरता वरील गीतावर शाळेचे विद्यार्थी विद्यार्थीनी लेक्षीम हातात घेऊन सादरीकरण केले.

हे पाहण्यासाठी महीला व नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. यावेळी शाळेतील मुख्याध्यापक राहुल सोनसळे, शाळेचे सहशिक्षक सहशिक्षिका यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. लेक्षीम वरील प्रभात फेरी पाहण्यासाठी सपोउपनि. गजानन गाडेकर , ग्रामसेविका सौ डि.ए शिंदे माने , सरपंच सौ शोभाबाई शेषेराव पाटील काळम, वैजनाथ पाटील घोरबांड , गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

आज सम्राट अशोक प्राथमिक शाळेत आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले आहे.तरी गावातील प्रतिष्ठित नागरिक व पालकांनी उपस्थित राहून आनंदनगरीचा लाभ घ्यावा असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांनी केले आहे.
