नांदेड| जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग अंतर्गत 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून स्वंयसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या दिव्यांगांच्या अनुदानित विशेष शाळा, कार्यशाळांमधील दिव्यांग मुला-मुलींच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धाचे 3 फेब्रुवारी रोजी नांदेड पोलीस परेड ग्राऊंड येथे तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन (Organization of sports and cultural competitions) 4 फेब्रुवारी रोजी कुसूम सभागृह नांदेड येथे करण्यात आले आहे.

स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या दिव्यांगांच्या अनुदानित, विनाअनुदानित आणि कायमस्वरूपी विनाअनुदानित अंध,अस्थिव्यंग,मतिमंद व मुकबधिर प्रवर्गाच्या विशेष शाळा, कार्यशाळांमधील दिव्यांग मुले-मुली यांच्यामधील दिव्यांगत्वानुरूप तथा दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार या स्पर्धा घेतल्या जातील. स्पर्धामध्ये 850 दिव्यांग मुले-मुली आणि संबधित शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. 4 फेब्रुवारी रोजी दिव्यांग मुले-मुलींच्या सुप्तगुणांना वावमिळावा या उद्देशाने सांस्कृतिक स्पर्धा कुसूम सभागृह नांदेड येथे आयोजन करण्यात आले आहे.

आयोजित क्रिडा स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धामध्ये दिव्यांग मुले-मुली व दिव्यांग व्यक्ती, लोकप्रतिनिधी, अधिकार-कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. याबाबत दिव्यांग मुले-मुली, उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांची कार्यक्रमप्रसंगी नियोजनाबाबत विविध समिती गठित करण्यात आली होती. त्या समिती सदस्यांची नियोजनाबाबत एकत्रित बैठक नुकतीच कै. यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद नांदेड येथे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला वै.सा.का. कैलास मोरे यांच्यासह सर्व शाळेतील मुख्याध्यापक, सर्व समिती प्रमुख, सदस्य उपस्थित होते.

माजी सैनिकांची ऑनलाईन नोंदणी आता अनिवार्य
महाराष्ट्र राज्य सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्यामार्फत सर्व डाटा डिजिटलायझेशन, संगणकीकरण करण्याचे काम सुरु आहे. https://.mahasainik.maharashtra.gov.in या वेबसाईटवर 31 मार्च 2025 च्या पूर्वी रजिस्ट्रेशन करून अर्ज भरून जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे जमा करावा. जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्त सैनिकी अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व अवलंबितांना याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

जर हे रजिस्ट्रेशन केले नाही तर महाराष्ट्र शासनाच्या ज्या सुविधा मिळतात त्या मिळणार नाहीत. यासाठी माजी सैनिकांना शुल्क म्हणून 100 रुपये लागणार आहे. माजी सैनिक विधवांना व अवलंबितांना शुल्क माफ आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे संपर्क करावा, असे आवाहन निवासी उप जिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर यांनी केले.