हिमायतनगर l सरसम बु येथिल शेतकरी दिगांबर भुसारे वय ६५ वर्ष हे प्रयागराज येथे मौनी अमावस्ये निमित्त शाही स्नान व देवदर्शनासाठी गेले असता प्रकृती खालावल्याने त्यांचे उपचारादरम्यान दिनांक २९ रोजी निधन झाले होते. गुरुवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर हिमायतनगर तालुकयातील मौजे सरसम बु. येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील शेतकरी भाविक दिगांबर भुसारे वय ६५ वर्ष हे प्रयागराज येथे मौनी अमावस्ये निमित्त शाहीस्नान व देवदर्शनासाठी गेले होते. दरम्यान तेथील गर्दी पाहून त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तात्काळ स्वरूप राणी नेहरू हॉस्पिटल शासकीय रूग्णालय प्रयागराज येथे अतिदक्षता विभागात भर्ती करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरू असतांना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, सुन, नातु,पंतु असा मोठा परीवार आहे. ते शिवाजी भुसारे व अंगणवाडी ताई प्रयागबाई भुसारे यांचे वडील तर उमेश कल्याणकर यांचे आजोबा होत.

त्यांचे पार्थिव देह प्रयागराज येथून गुरुवार दिनांक ३० जानेवारी रोजी हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम बु येथे सकाळी 7 वाजता पोचले. दुपारी 12 वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, शेतकरी व वारकरी संप्रदायातील भाविकभक्त व नातेवाईक, गावकरी हजारोच्या संख्येने उपस्थित होते.
