नविन नांदेड l छावा श्रमिक संघटना, जिजाऊ प्रतिष्ठाण, नांदेड व एन.टी.एस.ए.नांदेडच्या वतीने आयोजीत सार्वजनिक शिवजन्मोत्सव, वजीराबाद नांदेड समितीच्या अध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते भास्करराव हंबर्डे तर स्वागताध्यक्ष पदी डॉ. हंसराज वैद्य व्हॉईस ऑफ मिडीया पत्रकार संघाचे जिल्हा सचिव तथा शिवसेना ओबीसी व्हिजे एनटी नांदेड जिल्हाप्रमुख अनिल पाटील धमणे यांची निवड सर्व शिवप्रेमीच्या पदाधिकारी व कार्यकत्यांच्या वतीने करण्यात आली.

या निवडीबद्दल अध्यक्ष भास्करराव हंबर्डे व स्वागताध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य व पत्रकार अनिल पाटील धमणे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व्यक्त होत आहे.

निवड झाल्यानंतर सार्वजनिक शिवजन्मोत्सव 2025 च्या निमित्ताने दिनांक 19 फेब्रुवारी 2025 ते 25 फेब्रुवारी 2025 पर्यंत शालेय व महाविद्यालयीन स्तरावर शिवचरित्र पुस्तकांचे वाटप, शिवशाही निबंध स्पर्धेचे आयोजन, शिवरत्न पुरस्कारांचे वितरण व भव्य अन्नदान वाटप असे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सार्वजनिक शिवजन्मोत्सवचे अध्यक्ष भारकरराव हंबर्डे यांनी व्यक्त केले आहे .
