नांदेड| ट्रकला बनावट नंबर वापरुन ते भंगार मध्ये विक्री करण्यापुर्वी नांदेड ग्रामीण पोलीसांनी (The truck was seized by the Nanded Rural Police) मौजे कौठा येथील गुरुव्दारासमोरील रोडच्या बाजुला थांबलेला एक टाटा कंपनीचा 14 टायरचा ट्रक ज्याचा बनावट पासींग क्रमांक MH-27-BX-8488 ट्रकच्या चेसीस क्रमांक MAT541021H1B05252 ची माहिती काढून जप्त केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत बनावट नंबर वापरुन फसवणुक करणाऱ्या वाहनाची माहीती काढुन कार्यवाही करण्याचा आदेश सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांना दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोरीचे वाहन, बनावट नंबर प्लेट वापरुन फसवणुक करणारे वाहन तसेच वाहनाची तोड फोड करुन भंगार मध्ये विक्री करणारे आरोपी याची माहीती काढुन कार्यवाही करणे कामी गुन्हे शोध पथकाचे पोउपनि ज्ञानेश्वर मटवाड व सोबत गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी गोपनीय माहीती काढली.

त्या आधारे मौजे कौठा येथील गुरुव्दारासमोरील रोडच्या बाजुला थांबलेला एक टाटा कंपनीचा 14 टायरचा ट्रक ज्याचा बनावट पासींग क्रमांक MH-27-BX-8488 ट्रकच्या चेसीस क्रमांक MAT541021H1B05252 ची माहीती काढुन ट्रकचा ओरीजनल पासींग नंबर MH-12-NX-9980 किमंती 5,00,000/- रुपयाचा ट्रक मिळुन आल्याने आरोपी नामे गुरुप्रितसिंघ चिम्मा रा. नांदेड ता.जि. नांदेड याचेविरुध्द पो.स्टे. नांदेड ग्रामीण येथे गु.र.न. 92/2025 कलम 318(4), 336(2), 336(3),340 (2) बी.एन.एस प्रमाणे गुन्हा दाखल करुन सदर गुन्हयाचा तपास पोउपनि ज्ञानेश्वर मटवाड हे करीत असुन गुन्हयातील आरोपीचा शोध घेणेकामी एक पथक रवाना करण्यात आले आहे.

हि कार्यवाही अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड, खंडेराव धरणे अपर पोलीस अधिक्षक, भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, सुशील कुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग, इतवारा, नांदेड, यांचे मार्गदर्शनाखाली ओमकांत चिंचोलकर, पोलीस निरीक्षक पो.स्टे. नांदेड ग्रामीण, ज्ञानेश्वर मटवाड, पोलीस उपनिरीक्षक, पो.स्टे. नांदेड ग्रामीण, पोलीस अमंलदार पोहेकॉ. कऱ्हाळे, पाहेकॉ. गटलेवार, पोहेकॉ. केंद्रे, पोकॉ. सिरमलवार, पोकॉ. शिरगीरे, पोकॉ. आवळे, पोकों. कल्याणकर, पोकॉ. पवार,यांनी केली आहे. सदरची कामगीरी करणाऱ्या पथकाचे वरिष्ठांनी कौतुक केले आहे.
