The truck was seized by the Nanded Rural Police : ट्रकला बनावट नंबर वापरुन ते भंगार मध्ये विक्री करण्यापुर्वी नांदेड ग्रामीण पोलीसांनी केला जप्त
नांदेड| ट्रकला बनावट नंबर वापरुन ते भंगार मध्ये विक्री करण्यापुर्वी नांदेड ग्रामीण पोलीसांनी (The truck was seized by the Nanded Rural Police) मौजे कौठा येथील गुरुव्दारासमोरील रोडच्या बाजुला थांबलेला एक टाटा कंपनीचा 14 टायरचा ट्रक ज्याचा बनावट पासींग क्रमांक MH-27-BX-8488 ट्रकच्या चेसीस क्रमांक MAT541021H1B05252 ची माहिती काढून जप्त केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत बनावट नंबर वापरुन फसवणुक करणाऱ्या वाहनाची माहीती काढुन कार्यवाही करण्याचा आदेश सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांना दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोरीचे वाहन, बनावट नंबर प्लेट वापरुन फसवणुक करणारे वाहन तसेच वाहनाची तोड फोड करुन भंगार मध्ये विक्री करणारे आरोपी याची माहीती काढुन...
