श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे| माहूर तालुक्यातील इंदिरा गांधी योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना सह निराधार विधवा अपंग महिलां पुरुषांना सेतू केंद्रासह इतर ठिकाणी चकरा माराव्या लागू नये म्हणून तहसील कार्यालयातच (Court of the destitute was held in the Tehsil office itself) बोलावून त्यांच्या सर्व समस्यांचा निपटारा दि.३० जानेवारी रोजी केला.

कागदपत्रांच्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी बैठे पथकाची निर्मिती करून सर्व समस्यांचा निपटारा एकाच छताखाली केला गेल्याने सर्व आलेल्या शेकडो निराधारांनी तहसीलदार किशोर यादव यांचे आभार माणले.

तहसीलदार किशोर यादव यांनी तालुक्यातील निराधारांना प्रसिध्दी माध्यमातून अनेक वेळा आव्हान करूनही त्यांच्या अडचणीमुळे तसेच सेतू सेवा केंद्र आणि इतर कारणामुळे त्यांना आपली के.वाय.सी व हयात प्रमाणपत्रासह इतर कागदपत्रे सादर करण्यासाठी विलंब होत होता, त्यामुळे त्यांनी वर्तमानपत्रांच्या माध्यमातून दि.३० जाने. रोजी तहसील कार्यालयात येण्याचे आवाहन केले होते.

सदरील कार्यक्रमात तालुक्यातील निराधार, अपंग व वृद्धांनी तहसील कार्यालयात धाव घेत आपली उपस्थिती लावती होती. यावेळी नायब तहसीलदार डॉ. राजकुमार राठोड, उदय वानखेडे, वैभव पांढरे, रवी गुरनुले यांचेसह सर्व कर्मचाऱ्यांनी निराधारांच्या समस्या जाणून घेत निराकरण केल्याने आलेल्या सर्व निराधारांनी तहसीलदार किशोर यादव यांचे आभार मानले.
