हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील एकंबा येथील ग्रामपंचायत मध्ये वित्त आयोग व शासनाच्या इतर सर्व योजनेत सरपंच, ग्रामसेवक यांनी संगनमत करून मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. या झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. या प्रमूख मागण्या घेऊन २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पुर्व संध्येला दि. २५ रोजी येथील काही नागरीक पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते. दि. ३० सातव्या दिवशी गटविकास अधिकाऱ्याच्या आश्वासनानंतर या उपोषणाची सांगता झाली (Ekamba’s hunger strike returns to seventh day) आहे. गटविकास अधिकारी यांनी स्वतः हजर राहून स्वतःच चौकशी करून येत्या १० तारखेला चौकशी अहवाल तक्रार कर्त्याना देण्यात येईल. असे लेखी आश्वासन दिले आहे.

एकंबा येथील यशवंत मारोती वाघमारे व गावातील इतर नागरीक यांनी गावात झालेल्या शासनाच्या विविध योजनेत ग्रामसेवक व सरपंच, उपसरपंच यांनी संगनमत करून मोठ्याप्रमाणात गैरव्यवहार केला आहे. या सर्व भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होवून दोषींवर कारवाई करावी. यासह अनेक मागण्याचा संदर्भ देऊन उपरोक्त प्रकरणी गटविकास अधिकारी यांना मागणी करण्यात आली होती. प्रशासनाने गंभीर दखल घेतली नसल्याने लोकशाही मार्गाने उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले होते.

दरम्यान चौकशी समिती गावात चौकशीसाठी गेल्यानंतर समितीच्या समक्ष उपस्थित असलेल्या ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाने शिवीगाळ केली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच गाजला होता. याची धास्ती घेऊन पुन्हा वेगळी चौकशी समिती गावात पोचली असून, अखेर सातव्या दिवशी चौकशी झाली असून, चौकशी अहवाल येत्या दहा दिवसात देण्यात येईल असे लेखी पात्र दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले आहे. आता खुद्द गटविकास अधिकारी हे स्वताच या प्रकरणाची चौकशी करणार असल्याने, बिडीओच्या चौकशीतून काय? सत्य बाहेर येते हे पाहणे उत्सौक्त्याचे ठरणार असून तूर्तास एकंबेकरांचे उपोषण हे थाबले असून बिडीओ च्या कारवाईकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
