Friday, May 22

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Zilla Parishad School : तल्हारी जिल्हा परिषद शाळेचे चिमुकले संगणक हाताळनार

Zilla Parishad School : तल्हारी जिल्हा परिषद शाळेचे चिमुकले संगणक हाताळनार

करियर, नांदेड
शिवणी, भोजराज देशमुख| किनवट तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शिवणी अंतर्गत मौजे तल्हारी येथील जि.प प्राथमिक शाळेचे विद्यार्थी दरवर्षीय परीक्षेत विविध प्राविण्य मिळवितात.अशा हुशार विध्यार्थ्याच्या हातात संगणक असावे म्हणून ईस्लापूर येथील भारतीय स्टेट बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक संदीप मेश्राम यांच्या स्वखर्चातून येथील शाळेला दोन संगणक संच भेट दिले. सदरील दोन संगणक संच दि. 04 मार्च रोजी सायंकाळी एसबीआय बँकेचे शाखा व्यवस्थापक रमेश सवणे यांच्या हस्ते शाळेला सुपूर्त करण्यात आले.या अनुषंगाने शाळेचे मुख्याध्यापक गंगासांगरे यांनी उपस्थित मान्यवाराचे स्वागत केले. आज स्पर्धेचे युग आहे. शहरी विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा घरपोच मिळू लागल्या. कारण संगणकीय युगात आता मिनी संगणक म्हणून अँड्रॉइड मोबाईल प्रत्येकाकडे उपलब्ध आहे. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थी यांना उपलब्ध नसलेल्या सोयीसुवि...
Redressal of citizen grievances at Mukhed in the presence of CEO : सीईओंच्या उपस्थितीत मुखेड येथे नागरिकांच्या तक्रारींचे निवारण

Redressal of citizen grievances at Mukhed in the presence of CEO : सीईओंच्या उपस्थितीत मुखेड येथे नागरिकांच्या तक्रारींचे निवारण

करियर, नांदेड
नांदेड| जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या उपस्थितीत मुखेड पंचायत समिती येथे दिनांक 4 मार्च रोजी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्‍यात आले होते. मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या बैठकित नागरिंकांच्‍या समस्यांवर चर्चा करुन निवारण करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुखांची उपस्थिती होती. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी नागरिकांच्या व्यक्तिगत तक्रारी ऐकून त्यांच्यावर तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांनी प्रशासनाच्या या प्रयत्नांचे कौतुक केले. तक्रार निवारण दिनाच्या आयोजनामुळे नागरिकांना त्यांच्या समस्यांबाबत त्वरित उत्तर मिळाली. तक्रार निवारण उपक...
Spontaneous response : नांदेड ग्रंथोत्सवात ग्रंथ खरेदीस उत्स्फूर्त प्रतिसाद- अ.वा. सूर्यवंशी

Spontaneous response : नांदेड ग्रंथोत्सवात ग्रंथ खरेदीस उत्स्फूर्त प्रतिसाद- अ.वा. सूर्यवंशी

करियर, नांदेड
नांदेड| नांदेड येथील गुरुगोविंद सिंघजी स्टेडियम येथे आयोजित नांदेड ग्रंथोत्सवास ग्रंथसाहित्य व स्पर्धा परिक्षा ग्रंथ खरेदीस वाचकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी अ.वा.सुर्यवंशी यांनी दिली. उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गुरुगोविंद सिंघजी स्टेडियम येथे 28 फेब्रु ते 1 मार्च 2025 पर्यंत दोन दिवसीय नांदेड ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथोत्सवात वाचकांनी, ग्रंथप्रेमीनी ग्रंथ खरेदीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या ग्रंथोत्सवासाठी राज्यभरातून विविध प्रकाशनांची 20 स्टॉल लावण्यात आले होते. यात प्रमुख आकर्षण शासकीय प्रकाशन विक्री केंद्र होते. अधिकृत माहिती, शिवाय माफक दरात शासकीय प्रकाशने असल्यामुळे वाचकांनी गर्दी केली होती. जिल्हाभरातील...
hold school in morning session : शाळा सकाळ सत्रात भरवा; इब्टाची जिपकडे मागणी

hold school in morning session : शाळा सकाळ सत्रात भरवा; इब्टाची जिपकडे मागणी

नांदेड, करियर
नांदेड| वाढती उष्णता,जि.प. शाळेत भौतिक सुविधांची कमतरतेमुळे विद्यार्थी,शिक्षक व पालकांना त्रास होत असल्यामुळे ही बाब गांभीर्याने घेऊन जिल्हा परिषद शाळा सकाळच्या सत्रात घ्याव्यात अशी मागणी इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशन (इब्टा) महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेच्या वतीने नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल शिक्षणाधिकारी (प्रा.) डॉ.सविता बिरगे, शिक्षणाधिकारी (मा.) माधव सलगर यांच्याकडे संघनेने एका निवेदनाद्वारे केली आहे. नांदेड जिल्हा परिषेदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांना संघटनेचे केंद्रीय नांदेड जिल्हाध्यक्ष बालासाहेब लोणे, सरचिटणीस निलेश गोधने व संघटना पदाधिकारी यांनी निवेदन देऊन मागणी केली आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या कमालीची उष्णता वाढ झाली आहे आणि दिवसेंदिवस उष्णतेत वाढ होत आहे. शाळांमध्ये अनेक ठिकाणी भौतिक सुविधांचा अभाव आहे त्यामु...
Ghazalayan ; सुधाताई नरवाडकर यांच्या ‘ गझलायण ‘ पुस्तकाचे थाटात प्रकाशन

Ghazalayan ; सुधाताई नरवाडकर यांच्या ‘ गझलायण ‘ पुस्तकाचे थाटात प्रकाशन

नांदेड, करियर
नांदेड l गझलकारा सुधाताई नरवाडकर यांच्या प्रत्येक गझलेत विचारांची खोली आहे. मराठी भाषेवरील त्यांचे प्रेम व प्रभुत्व त्यांच्या दिलेल्या गझलेमध्ये जागोजागी जाणवते. अखिल मानव जातीबद्दल त्यांच्या मनात कळवळा आहे आणि त्यांचे गझलेवर नितांत प्रेम आहे. गझलेसाठी जणू त्या वेड्या झालेल्या आहेत. गझलेचे वेडं माणसाला आयुष्यात उभे करते. तसेच कुटुंबाला सावरण्याची ऊर्जा देते. अध्यात्म, हळुवार प्रेम, सामाजिक बांधिलकी, स्त्रीजीवन, स्त्री जीवनाचे विविध कंगोरे, विविध नाती, त्यामधील ताणतणाव, विद्यार्थ्याप्रती असणारा जिव्हाळा, निसर्गाची ओढ, देशभक्ती, मानवतेची सर्व मूल्ये त्यांच्या गझलेमध्ये आढळतात, असे मत कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध गझलकार अभियंता प्रवीण पुजारी यांनी व्यक्त केले. जुन्या पिढीतील ज्येष्ठ साहित्यिक बी. रघुनाथ यांच्या कन्या तथा मराठवाड्यातील गझलकारा श्रीमती सुधाताई नरवाडकर यांच्या ' गझलायण ' या ...
Exam ; वडिलांचे छत्र हरवल्यानंतर मुख्याध्यापकांच्या पाठबळाने साश्रुनयनाने दिली दहावीची परीक्षा

Exam ; वडिलांचे छत्र हरवल्यानंतर मुख्याध्यापकांच्या पाठबळाने साश्रुनयनाने दिली दहावीची परीक्षा

करियर, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। येथील एका परीक्षा केंद्रावर वडिलांचे छत्र हरवल्यानंतर दुःखात बुडालेल्या विद्यार्थ्याने केवळ मुख्याध्यापकांच्या पाठबळाने साश्रुनयनाने दिली दहावीची परीक्षा. सेवालाल नगर, टाकळी ता.उमरखेड येथील सुरज संजय जाधव हा विद्यार्थी इंदिरा गांधी विद्यालय गोकुंदा येथे इयत्ता 10 वीत शिकत आहे. तो येथील सुमतीबाई हेमसिंग नाईक कन्या माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रावर शुक्रवार (ता.21 फेब्रुवारी 2025 ) पासून तो 10 वीची परीक्षा देत आहे. शनिवारी (ता. 1 मार्च ) पहाटे ठीक 5:30 वाजता त्याचे वडील संजय जाधव यांचे दिर्घ आजाराने निधन झाले. त्याच्या डोक्यावरचे छत्र हरपले. वडीलांचे कलेवर,अंत्यविधी असा दुःखाचा डोंगर चढून  परीक्षा द्यायची कशी ? असा तो विचार करू लागला. मनाची विचलता,वडीलांच्या निधनाच्या वेदना,जवळ जवळ सुरज जीवनाच्या परीक्षेत नापास झाल्याचे चित्र,परंतु अशावेळी त्या ने शाळेचे मु...
Pawar family ; वाढदिवसावरील खर्च टाळून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप ;पवार कुटुंबियांचा उपक्रम

Pawar family ; वाढदिवसावरील खर्च टाळून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप ;पवार कुटुंबियांचा उपक्रम

करियर, नांदेड
लोहा l जिजामाता ग्रामीण शिक्षण संस्था , लोहाचे अध्यक्ष वसंतराव पवार यांनी नातवंडांचा वाढदिवस साजरा करताना अनाठायीं खर्चाला फाटा दिला व संस्थेअंतर्गत .शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले व नातू श्लोक श्रीकांत पाटील यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांत साजरा केला काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष व जिजामाता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वसंतराव पवार यांचा नातू श्लोक श्रीकांत पवार यांना वाढदिवस साजरा करताना यावर्षीही अनाठायी खर्चाला फाटा दिला. संस्थेचे कोषाध्यक्ष श्रीकांत पवार व संचालिका सईताई पवार या दाम्पत्यांनी मुलांचा वाढदिवस साजरा करताना त्यांनी सामाजिक दायित्व स्वीकारून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचा निर्णय घेतला शिवछत्रपती प्राथमिक व माध्यमिक शाळा लोहा डॉ याकूबखान उर्दू प्राथमिक शाळा लोहा, वि ग पवार इंग्लिश स्कुल या शाळेतील विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष वसंतराव पवार यां...
Deputy Commissioner Vidya Shitole : युवकांनी रोजगारासोबतच स्वयं रोजगार निर्मितीवर भर द्यावा – उपायुक्त विद्या शितोळे

Deputy Commissioner Vidya Shitole : युवकांनी रोजगारासोबतच स्वयं रोजगार निर्मितीवर भर द्यावा – उपायुक्त विद्या शितोळे

करियर, नांदेड
नांदेड| रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी मोठया प्रमाणात उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून युवकांना त्यांच्या आयुष्याला दिशा देण्याची संधी मिळत आहे. युवकांनी या संधीचा आवश्य लाभ करुन घ्यावा. तसेच युवकांनी रोजगारासोबतच स्वयंरोजगार निर्मितीवरही भर द्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास विभाग छ. संभाजीनगरच्या उपायुक्त विद्या शितोळे यांनी केले. आज यशवंत महाविद्यालयात रोजगार व स्वयंरोजगार विभागामार्फत पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे ॲड . उदयरावजी निंबाळकर, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापिठाचे संचालक डॉ. सुर्यप्रकाश जाधव, प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे, रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या सहायक आयुक्त रेणूका तम्मलवार, उपप्राचार्य क...
Seshrao Patil ; शेषराव पाटील यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

Seshrao Patil ; शेषराव पाटील यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

करियर, नांदेड
श्रीक्षेञ माहूर,  कार्तिक बेहेरे l अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संस्कृती संवर्धन महामंडळ आणि मौलिक अधिकार समाजसेवा मंडळ आदिलाबाद तेलंगणा यांच्या वतीने गुरु रविदास फेस्टिवलमध्ये माहूर येथील शिक्षक शेषराव पाटील यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तेलंगणातील आदिलाबाद मधील लक्ष्मीनगर येथील गुरु रविदास मंदिरात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरु रविदास फेस्टिवल आदिलाबादचे अध्यक्ष मधु बावलकर होते. तर जेष्ठ साहित्यिक चंद्रप्रकाश देगलूरकर, प्रशांत वंजारे, गजानन सोनोने, अशोक वासाटे, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश मुनेश्वर आदी उपस्थित होते. गुरु रविदास जयंतीच्या निमित्ताने सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. शेषराव पाटील यांना तेलंगणाचे माजी मंत्री जोगू रामन्ना यांच्या हस्ते पुर...
Gurmeetsingh Tamana ; गुरुद्वारा बोर्ड कर्मचाऱ्यांना नियमानुसार पदोन्नति मिळावी : गुरमीतसिंघ टमाना

Gurmeetsingh Tamana ; गुरुद्वारा बोर्ड कर्मचाऱ्यांना नियमानुसार पदोन्नति मिळावी : गुरमीतसिंघ टमाना

नांदेड, करियर
नांदेड l येथील सर्वोच्च धार्मिक संस्था गुरुद्वारा तखत सचखंड बोर्ड मध्ये कार्यरत वरिष्ठ कर्मचाऱ्यांना नियमानुसार पदोन्नति देण्यात यावी. दोन वर्षें डेली वेजेस सेवा पूर्ण करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना स्थाई सेवेत समाविष्ट करुन घ्यावे आणी रोजन्दार तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांना डेली वेजेस सेवेत सहभागी करुन घेण्यात यावे. अशी मागणी शिवसेना पक्षाचे दक्षिण विभागातील सहसंपर्क प्रमुख सरदार गुरमीतसिंघ टमाना यांनी एका पत्राद्वारे गुरुद्वाराचे प्रशासक डॉ विजय सतबीरसिंघ यांच्याकडे केली आहे. पात्रात नमूद करण्यात आले आहे की गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने कर्मचाऱ्यांना पदोन्नति देण्यात बाबत एका त्रिसदस्यीय समितीचे गठन करण्यात आले आहे. पण पदोन्नति देण्यातकरिता नियमांचे पालन आवश्यक आहे. महाराष्ट्र सर्विस रूल्सचे आधार घेवून आणी वेतन श्रेणीच्या सिफाराशिचा अभ्यास करुनच निर्णय घेण्यात यावेत. मागील काळात ज्या व...
error: Content is protected !!