नवीन नांदेड l हडको येथील विघानिकेतन शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन समलेंन निमित्ताने आयोजीत सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये शाळेतील सहभागी विद्यार्थी व विद्यार्थिनी विविध सामुहिक व वैयक्तिक नृत्यावर अनेक गितातुन नृत्य सादर केली यावेळी या स्नेहसंमेलनचे ऊघ्दाघाटन युवा नेते संजय पाटील घोगरे यांनी केले.

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम अंतर्गत वार्षिक स्नेहसंमेलन हडको येथील विघानिकेतन प्राथमिक व माध्यमिक शाळेच्ये 3 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले होते.

यावेळी उद्घाटक म्हणून युवा नेते संजय पाटील घोगरे, नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तिरूपती पाटील घोगरे, कार्याध्यक्ष रमेश ठाकूर व पत्रकार दिंगाबर शिंदे यांच्यी उपस्थिती होती,
यावेळी संजय पाटील घोगरे यांनी उद्घाटन करून स्नेह संमेलन प्रसंगी स्नेह संमेलन मधुन अनेक विद्यार्थी कलाकार म्हणून पुढे आले असून विध्यार्थाचा सप्त गुणांना वाव मिळत असल्याचे सांगितले.

उपस्थित पाहुण्यांचे स्वागत माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. विनया बेताळे व प्राथमिक मुख्याध्यापक बि.के.मटकवार यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनीभावगीत, लोकगित, पोवाडा, देशभक्ती गितासह लोकप्रिय मराठी हिंदी गितावर सामुहिक व वैयक्तिक नृत्य सादर केले तर नाटीका सादर करण्यात आली.

सुत्रसंचलन संजय काचावार यांनी तर कार्यक्रम यशस्वीते साठी सि.पी.कामठाणे, व्हि.एम. हिवराळे, गायकवाड, राऊत, कदम, कांबळे, माने, येरमलवाड, मानुरकर ,परविन खान यांच्या सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या प्रसंगी विध्यार्थी पालक व नागरिक महिला नागरीक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.