हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहरातील श्रीकृष्ण उखळाई मंदिराच्या कलाशरोहन कार्यक्रमाचा भव्य सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. हदगाव शहरातील मठाचे मंहत योगी बापू यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमाला मराठवाडा व विदर्भातील हजारो भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्ते राजकीय नेते, आमदार आणि खासदार यांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून आली. या कार्यक्रमाला अपेक्षेपेक्षा जास्त जनसमुदाय जमल्याने पोलिसांना मात्र मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. गर्दीचा अंदाज न आल्यामुळे अनेक भक्तांना पंडालात प्रवेश करता आला नाही. कार्यक्रमाच्या वेळी हदगाव विधानसभा क्षेत्राचे लोकप्रतिनिधी आमदार बाबुराव कदम कोहळीकर… यांचा साधेपणा विशेषत्वाने जाणवला. ते साध्या भक्ताप्रमाणे कार्यक्रमाचे नियोजन आणि पाहुण्यांच्या बसण्याची व्यवस्था करताना दिसत होते.

कधी आलेल्या जनतेमध्ये मिसळत होते तर कधी स्टेजवर जाऊन प्रमुख पाहुण्यांची बसण्याची व्यवस्था पाहत होते. त्यांच्या या तळमळ लक्ष वेधून घेत होते. इतर वक्त्यांचे व मुख्यमंत्र्यांचे भाषण संपेपर्यंत ते कुठेही बसलेले दिसून आले नाहीत. एका साध्या कार्यकर्त्या सारखे वागत असलेले हदगाव विधानसभा क्षेत्राचे आ.बाबुराव कदम कोहळीकर यांचा हा साधेपणा लोकनियुक्त आमदार झाल्यानंतरही कायम आहे हे विशेष.

पोलिसांना गर्दीचा अंदाज आला नाही..!
मुख्यमंत्री कार्यक्रमाला येणार असल्याने पोलिसांच नियोजन कुठेतरी चुकल्या सारखं वाटलं व अपेक्षापेक्षा जास्त जनसागर लोटल्याने, यासाठी योग्य नियोजन करायला हवे होते मात्र तसे दिसून आले नाही. सुरक्षा पास काहींना वाटण्या आले होते. विशेष म्हणजे काही स्थानिय मोजक्याच पत्रकारांना सुरक्षापास देण्यात आले होते. तथापी इतर माध्यमाच्या प्रतिनिधींना वृत्तसंकलन करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागला..!