HomeनांदेडImmediately Support : आश्वासन नको, तात्काळ शेतकर्‍यांना मदत करा - स्वाभिमानी संभाजी...

Immediately Support : आश्वासन नको, तात्काळ शेतकर्‍यांना मदत करा – स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष माधवराव पा. देवसरकर

नांदेड| संपूर्ण मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्यावर अतिवृष्टीचे संकट ओढवले असून शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतमाल पाण्यात वाहून गेला, जनावरांचा मृत्यू झाला, तर अनेक गोरगरिबांच्या घरामध्ये पाणी घुसून संसार उद्ध्वस्त झाला आहे. दिवाळीसारख्या सणासुदीच्या दिवसांतच शेतकर्‍यांच्या माथी दुर्दैव कोसळले असून शेतकरी हताश झाले आहेत.

या परिस्थितीत सरकार केवळ आश्वासन देत आहे, मात्र प्रत्यक्षात मदतीचा ठोस निर्णय घेतलेला नाही, अशी टीका स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर यांनी केली आहे. शेतकर्‍यांना तात्काळ मदत मिळाली पाहिजे. नुकसानग्रस्तांना योग्य ती नुकसानभरपाई मिळावी. गोरगरिबांना अन्नधान्य व निवार्‍याची सोय करून दिली पाहिजे. सरकारने वेळ न दवडता तातडीने निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

अतिवृष्टीमुळे शेतीमाल, जनावरे व घरे उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी पूर्णपणे संकटात सापडले आहेत. अनेक शेतकरी दिवाळीचा सण साजरा करण्याऐवजी झालेल्या नुकसानीच्या वेदना सोसत आहेत. या पार्श्वभूमीवर, आश्वासन नको, तर तात्काळ मदत करा, असे ठाम विधान करीत स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने शासनाला तातडीची मदत करण्याचे आवाहन केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments