श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे l सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अंजनखेड येथे दि. १ रोजी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यां मध्ये मध्ये व्यापारी वृत्ती वाढावी व व्यवहारिक ज्ञान मिळावे या उद्दात हेतूने विद्यालयाच्या प्राचार्या नंदा जयस्वाल प्रा. जयकुमार खराटे, पर्यवेक्षक एन. एम.राठोड यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात अनेक विद्यार्थ्यांनी विविध खाद्य पदार्थाचे स्टॉल लावले होते.

चहा, कॉफी, फ्रुटज्यूस, पापड, भजे, मसाला पुलाव, मठ्ठा, लसी हरभरा उसळ आदि सह विवीध रुचकर पदार्थाची रेलचेल होती. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा माजी जि. प.सदस्या विमलताई खराटे, संस्थेचे सचिव ज्योतिबादादा खराटे यांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थिती लाऊन सर्वच दुकानांना भेटी दिल्या व तेथील रुचकर पदार्थ स्वतः खरेदी करून स्वाद घेतला. यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद व्दिगुणित झाला. मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्याना प्रोत्साहित करून परिश्रम घेतले.
