श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे l जि.प.प्रा.शाळा सायफळ व ग्रामपंचायत सायफळ यांच्या संयुक्त विद्यमाने ७६ व्या ‘प्रजासत्ताक दिनाच्या’ औचित्यावर दि.३० जानेवारी रोजी ‘सांस्कृतिक महोत्सव’ तथा ग्रामपातळीवर ‘खुल्या रांगोळी स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले होते.

हा सांस्कृतिक महोत्सव सकाळ व दुपार अशा दोन सत्रात आयोजित करण्यात आला होता.सकाळच्या पहील्या सत्रात ग्रामपाळीवर खुल्या रांगोळी स्पर्धेचे आयोजन ग्रामपंचायत व जि.प.शाळा यांनी घेतली.या स्पर्धेत गावातील एकूण १०० स्पर्धकांनी सहभाग घेतला.ही विशेष बाब होती. रांगोळी स्पर्धेच्या निमित्ताने गावातील प्रत्येक घरापुढे स्वच्छता आणि शुशोभन व्हावं आणि ग्रामस्वच्छता अभियान सुद्धा संपन्न व्हावं असा उद्देश सफल करण्यात आला.या स्पर्धेत प्रथम पारितोषिक दिक्षा ज्ञानेश्वर शेंडे,द्वितीय किरन आशोक राऊत, तृतीय शिवण्या विनायक कुट्टे तर प्रोत्साहनपर पारितोषिक आकांक्षा पुनवटकर व उज्ज्वला गावंडे यांना देण्यात आले.त्यांना सांस्कृतिक कार्यक्रमात पारितोषिक देऊन मान्यवरांकडून गौरविण्यात आले.

दुसर्या सत्रात सांस्कृतिक महोत्सव संपन्न करण्यात आला.याची सुरुवात शाळेचे सहायक शिक्षक मिलिंद कंधारे सर यांनी मुलांसमवेत तबला-हार्मोनिअम वर तालासुरात परिपाठाच्या माध्यमातून केली.यामध्ये मुलांनी राष्ट्रगीत,ईशस्तवन,स्वागतगीत,स्फूर्तीगीत यासारख्या गीतांच्या सुरेल सादरीकरणाने उपस्थितांना एक आगळा नजराणा दिला.सायफळ येथील विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीते, लोकगीते,चित्रपट गीते यावर बहारदार नृत्य सादर केली.त्यात वर्ग पहिली ते पाचवी च्या विद्यार्थ्यांकडून सादर सुंदर नृत्यांना मान्यवरांसह प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.या सादरीकरणासाठी समस्त परिसरातून कौतुक होते आहे.

या कार्यक्रमासाठी गावच्या सरपंच रेखा रमेश कुमरे,उपसरपंच कपिल मानिक शेंडे,शा.व्य.स.अध्यक्ष प्रफुल्ल शेंडे,ग्रामसेवक शिवाजी गावंडे,आमोल माटवे, इरफान शेख,ज्योती मुजमूले,रेखाताई कुटे यांच्यासह मुख्याध्यापक वाई तांडा उत्तम पवार, मुख्याध्यापक व्यंकट फड गोंडेगाव,अंजनखेड चे मुख्याध्यापक अभिजीत होनवडजकर तसेच कै.पार्वतीबाई विद्यालयाचे संचालक सचिन राजूरकर व पत्रकार राजीक शेख,विष्णू कुडमते, शरद कुडमते,पो.पा.हेमंत गावंडे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बालाजी नामावार यांनी तर सुत्रसंचालन मिलींद कंधारे,गौतम मुनेश्वर यांनी केले.तर आभार ग्रामसेवक शिवाजी गावंडे यांनी मानले.
