Cultural festival ; जि.प.प्रा.शाळा सायफळ येथे रांगोळी स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव संपन्न
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे l जि.प.प्रा.शाळा सायफळ व ग्रामपंचायत सायफळ यांच्या संयुक्त विद्यमाने ७६ व्या 'प्रजासत्ताक दिनाच्या' औचित्यावर दि.३० जानेवारी रोजी 'सांस्कृतिक महोत्सव' तथा ग्रामपातळीवर 'खुल्या रांगोळी स्पर्धेचे' आयोजन करण्यात आले होते.
हा सांस्कृतिक महोत्सव सकाळ व दुपार अशा दोन सत्रात आयोजित करण्यात आला होता.सकाळच्या पहील्या सत्रात ग्रामपाळीवर खुल्या रांगोळी स्पर्धेचे आयोजन ग्रामपंचायत व जि.प.शाळा यांनी घेतली.या स्पर्धेत गावातील एकूण १०० स्पर्धकांनी सहभाग घेतला.ही विशेष बाब होती. रांगोळी स्पर्धेच्या निमित्ताने गावातील प्रत्येक घरापुढे स्वच्छता आणि शुशोभन व्हावं आणि ग्रामस्वच्छता अभियान सुद्धा संपन्न व्हावं असा उद्देश सफल करण्यात आला.या स्पर्धेत प्रथम पारितोषिक दिक्षा ज्ञानेश्वर शेंडे,द्वितीय किरन आशोक राऊत, तृतीय शिवण्या विनायक कुट्टे तर प्रोत्साहनपर पारितोषिक आकांक्ष...
