नांदेड| महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी परीक्षेचा निकाल मंगळवार 13 मे 2025 रोजी जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेस प्रविष्ट सर्व विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका 2025 डिजीलॉकर Digilocker मध्ये उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.


ज्या विद्यार्थ्यांचे APPAR-ID उपलब्ध आहेत व मंडळाकडे अचुक नोंदविलेले आहेत त्यांच्या गुणपत्रिका APPAR-ID सोबत Link Digilocker Account मध्ये push करण्यात आलेल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे APPAR-ID उपलब्ध नाहीत अथवा मंडळाकडे नोंदविलेले नाहीत त्यांच्या परीक्षेचे वर्ष व बैठक क्रमांक टाकून गुणपत्रिका Digilocker app मध्ये उपलब्ध करुन घेता येतील. यासंदर्भात विभागीय मंडळ कार्यकक्षेतील सर्व संबंधित मुख्याध्यापक, विद्यार्थी व पालक यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळ सचिव देविदास कुलाळ यांनी केले आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात आल्या होत्या.

शिकाऊ-पक्के अनुज्ञप्ती शिबिराचे तालुकानिहाय आयोजन
प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने शिकाऊ व पक्के अनुज्ञप्तीसाठी जुलै ते डिसेंबर 2025 या महिन्यात तालुका शिबीर कार्यालय आयोजित करण्याचे नियोजन केले आहे. या शिबिरासाठी जागा उपलब्धतेच्या आधीन राहून ऑनलाईन अपॉईंटमेंट महिना सुरु होण्याच्या 5 दिवस आधी कार्यालयीन वेळेत सुरु करण्यात येणार आहे.

शिबिराचे ठिकाण
कंधार तालुक्यात 3 जुलै, 4 ऑगस्ट, 2 सप्टेंबर, 3 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर, 3 डिसेंबर.
धर्माबाद तालुक्यात 7 जुलै, 6 ऑगस्ट, 4 सप्टेंबर, 6 ऑक्टोबर, 6 नोव्हेंबर, 5 डिसेंबर.
किनवट तालुक्यात 9 जुलै, 11 ऑगस्ट, 11 सप्टेंबर, 10 ऑक्टोबर, 10 नोव्हेंबर, 10 डिसेंबर.
मुदखेड तालुक्यात 14 जुलै, 14 ऑगस्ट, 15 सप्टेंबर, 15 ऑक्टोबर, 14 नोव्हेंबर, 15 डिसेंबर.

माहूर तालुक्यात 17 जुलै, 18 ऑगस्ट, 18 सप्टेंबर, 17 ऑक्टोबर, 17 नोव्हेंबर, 17 डिसेंबर.
हदगाव तालुक्यात 21 जुलै, 20 ऑगस्ट, 22 सप्टेंबर, 24 ऑक्टोबर, 20 नोव्हेंबर, 19 डिसेंबर.
धर्माबाद तालुक्यात 23 जुलै, 22 ऑगस्ट, 24 सप्टेंबर, 27 ऑक्टोबर, 24 नोव्हेंबर, 23 डिसेंबर.
हिमायतनगर तालुक्यात 28 जुलै, 26 ऑगस्ट, 26 सप्टेंबर, 29 ऑक्टोबर, 26 नोव्हेंबर, 29 डिसेंबर.
किनवट तालुक्यात 30 जुलै, 29 ऑगस्ट, 29 सप्टेंबर, 31 ऑक्टोबर, 28 नोव्हेंबर, 31 डिसेंबर याप्रमाणे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
अपॉईंमेंट घेतलेल्या सर्व अर्जदारांनी याची नोंद घ्यावी व शिबीर कार्यालयास उपस्थित रहावे. दिलेल्या दिनांकामध्ये स्थानिक सुटी जाहीर झाल्यास अथवा आपत्कालीक परिस्थिती निर्माण झाल्यास शिबिराच्या तारखेत बदल होऊ शकतो. याची सर्व संबंधित नागरीकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी केले आहे.